टीम इंडिया (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी मजबूत कामगिरी करत बांग्लादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार खेळ करत बांग्लादेशला पहिल्या डावात 150 धावांवर ऑल आऊट केले. पहिल्या दिवशी भारताकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने सर्वाधिक तीन विकेट घेतले. शमीने बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम यालाही बाद केले, परंतु त्याआधी मैदानावर एक मजेदार घटना पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले नसते, बांग्लादेशचा संघ अवघ्या 100 धावाही करू शकला नास्ता. खराब क्षेत्ररक्षणातही कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या फिल्डर्स आणि गोलंदाजांचे जोमात प्रोत्साहन करत होता. शमीने ज्या चेंडूवर रहीमची विकेट घेतली तो एक आश्चर्यकारक चेंडू होता. इंदोरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टदरम्यान चाहत्यांचा उत्साह पाहून कोहलीदेखील उत्साहीत झाला आणि मध्यंतराच्या वेळी त्याने चाहत्यांनाही प्रोत्साहन केले. (IND vs BAN 1st Test Day 1: इंदोर टेस्टमध्ये आर अश्विन याची विक्रमी कामगिरी; अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्यासह 'या' खास क्लबमध्ये झाला समावेश)

भारत-बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान एक क्षण असा होता जेव्हा कोहलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शमीने मुशफिकूरची विकेट घेण्यापूर्वी विराट रनअपसाठी जात होता, त्याचवेळी त्याने प्रेक्षकांकडे लक्ष वेधले आणि शमीला प्रोत्साहन करा असे सांगितले. या प्रसंगाच्या पुढील चेंडूवर शमीने 43 धावांवर खेळत असलेल्या रहीमला बोल्ड केले. मुशफिकूर बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर शमीने मेहदी हसन याला एलबीडब्ल्यू बाद केले. रहीमने बांग्लादेशकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. विराटचा प्रेक्षकांसोबतचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हीही पाहा:

पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पहिल्या डावात आर अश्विन, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर शमीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. मात्र, या डावात रवींद्र जडेजा याला एकही विकेट मिळू शकली नाही.