India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team:  भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे.  सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांग्लादेशच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत भारताला लागोपाठ मोठे मोठे धक्के दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले तर शुभमन गिल खाते न उघडता बाद झाला.  (हेही वाचा - India vs Bangladesh 1st Test Day 1 Stumps Scorecard: शतकवीर अश्विन - जाडेजांनी भारताचा डाव सावरला, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 339)

आहे. आता 25 वर्षीय फलंदाजाच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले आहेत. अनेकांनी त्याला ट्रोल केले.

पाहा पोस्ट -

अनेकांनी त्याची तुलना बाबार आजमशी देखील केली.

अनेकांनी तो सध्याच्या संघात फीट होत नसल्याचे म्हटले आहे.

सध्या शुभमन गिलचा फॉर्म खराब असला तरी त्याची आता पर्यंतची आकडेवारी चांगली आहे.

शुभमनने आतापर्यंत 47 कसोटी डावांमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांच्या मदतीने 1492 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 35.52 इतकी आहे. शुभमनचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 128 धावा आहे.