PIC Credit - BCCI X Account

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. या सामन्यात बांगालदेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी फारच खराब झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिलसारखे फलंदाज पहिल्या तासात स्वस्तात बाद झाले. भारताच्या या खराब सुरूवातीनंतर प्रथम यशश्वी जयस्वाल (57)  आणि नंतर रविंद्र जाडेजा आणि आर अश्विनने भारताचा डाव संभाळला. अष्ट्रपेलु खेळाडू आर अश्विनने शतक झळकावले. (हेही वाचा - Ravichandran Ashwin Century: आर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील झळकावले सहावे शतक, टीम इंडियाची सामन्यात मजबूत पकड)

पाहा पोस्ट -

भारतीय संघातील दिग्गज खेळाडूसाठी कठीण दिसणाऱ्या चेन्नईतील या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन संकटमोचन ठरला. अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 6 वे शतक पूर्ण केले. अश्विनचे हे आपल्या करिअरमधले सर्वात जलद शतक आहे. अश्विन आणि जडेजा यांनी मिळून भारतीय डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 339 वर 6 बाद होती तर अश्विन 102 धावांवर तर रविंद्र जाडेजा 86 धावांवर नाबाद आहे.