भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात 3 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघातील पहिला सामना दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) मध्ये खेळला जाणार आहे. पण मालिकेच्या पहिल्या मॅचआधी प्रदूषण ही चिंतेची बाब बनली आहे. दिवाळीनंतर दिल्लीच्या प्रदूषणात भरपूर वाढ झाली आहे, जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. मॅचच्या काही दिवसांपूर्वी दोन्ही संघाच्या खेलडुंनी स्टेडियममध्ये सराव केला. या मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहितने मॅचपूर्वी पत्रकार परिषदेत सर्वांशी संवाद साधला. यादरम्यान, एकाने त्याला दिल्लीच्या प्रदूषणावर प्रश्न विचारले असता त्याने मजेदार अंदाजात उत्तर आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले. (IND vs BAN Test 2019: भारत-बांग्लादेश संघातील पहिल्या डे-नाईट टेस्ट सामन्यासाठी तिकिटांचे दर आणि मॅचची वेळ, जाणून घ्या)
दिल्लीत होणार्या पहिल्या टी-20 आधी प्रदूषणाच्या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित हसला आणि त्याने विनोदपूर्वक या प्रश्नाचे उत्तर दिले आणि म्हणाला, "मसाला हवा आहे, पण देणार नाही." रोहितने या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. दिल्लीतील टी-20 सामन्यांमधील प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन प्रेक्षक सोशल मीडियावर ट्विट करत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की तेथे सामना असावा, तर काही लोकांना हा सामना न खेळला जावा असे म्हणणे आहे. मात्र, बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे की सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल. बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी हा सामना अन्यत्र हलविण्याची मागणी केली. मात्र, बीसीसीआयने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
Masala Chahiye... Lekin Doonga nahin..
😂😂😂😂😂
Hitman on the Fire.. #RohitSharma @ImRo45 pic.twitter.com/6oeJxcOtay
— I'm@Chandan (@Chandan_Ro_264) November 1, 2019
शुक्रवारी अरुण जेटली स्टेडियमवर प्रशिक्षणादरम्यान उदरच्या डाव्या बाजूस मार लागल्यानंतर रोहितला बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाने बांग्लादेशविरुद्ध मालिकेच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्यासाठी फिट असल्याचे स्पष्ट केले.