IND vs AUS ODI 2020: टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचे 'हे' खेळाडू वनडे मालिकेत ठरू शकतात घातक, राहावे लागेल सतर्क
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Photo Credit: IANS)

IND vs AUS ODI 2020: आयपीएलनंतर टीम इंडिया (Team India) आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. पहिले दोन संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका 27 नोव्हेंबरपासून खेळली जाईल. कांगारू दौर्‍यावर फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. कोविड-19 मुले सक्तीच्या ब्रेकनंतर टीम इंडिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असेल. तथापि, युएईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन्ही देशांमधील खेळाडूंनी काही स्पर्धात्मक क्रिकेट खेळले आहेत. आयपीएलपूर्वी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी इंग्लंड दौर्‍यावर ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली होती. आणि आता भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विजयी सुरुवात करू पाहत असेल. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे आयपीएल चांगले सिद्ध झाले नाही. ग्लेन मॅक्सवेलचा हंगाम खराब झाला होता तर स्मिथ आणि आरोन फिंच यांनाही सूर गवसला नाही. (India in Australia 2020-21: केएल राहुल भारतासाठी आगामी 3 वर्ल्ड कपमध्ये विकेटकीपिंग करण्यास सज्ज, MS Dhoni याला रिप्लेस करण्यावर केले मोठे विधान)

ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यावर टीम इंडियाने (India Tour of Australia) वनडे मालिकेत विजय मिळवला होता आणि यंदा देखील ते विजयाची पुनरावृत्ती करू पाहत असतील, पण टीम इंडियाला हे करणे सोप्पे जाणार नाही. ऑस्ट्रेलियाने संघात काही अशा खेळाडूंची निवड केली आहे जे भारतीय संघासाठी घातक ठरू शकतात.

1. स्टिव्ह स्मिथ

स्मिथने यापूर्वीच स्पष्ट केले की तो फॉर्ममध्ये परतला आहे आणि भारताविरुद्ध तो शानदार प्रदर्शन करेल. बॉल-टॅम्परिंग प्रकरणामुळे भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेला स्मिथ यंदा आपला ठसा उमटवण्यासाठी उत्सुक असेल. स्मिथने आजवर भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली असून भारताच्या घातक गोलंदाजीपुढे आक्रमक फलंदाजी करून संघासाठी मोठा स्कोर करू इच्छित असेल.

2. डेविड वॉर्नर

वॉर्नर निःसंशयपणे वाईट-बॉल क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज आहे आणि त्याच्यात स्वतःच्या खेळाने मॅचची दिशा बदलण्याची क्षमता आहे. भारताविरुद्ध खेळताना वॉर्नरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 19 सामन्यात तीन शतकांसह 49.29 च्या सरासरीने 838 धावा केल्या आहेत. बहुप्रतीक्षित मालिकेसाठी आघाडीवर असलेल्या वॉर्नरची विकेट टीम इंडियासाठी महत्वाची ठरेल कारण त्याने टिकून खेळ केल्यास तो मोठी धावसंख्या उभारू शकतो.

3. अ‍ॅडम झांपा

मर्यादित षटकांच्या मालिकेत झम्पा ऑस्ट्रेलियाकडून मोठी भूमिका निभावेल अशी अपेक्षा केली जात आहे. कर्णधार विराट कोहलीविरुद्ध त्याने एक उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. झांपाने भारतीय कर्णधाराला वनडेमध्ये सर्वाधिक वेळा बाद केले आहे. यापूर्वी, जानेवारीत भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत झांपाने तीन सामन्यात दोनदा कोहलीची विकेट घेतली. भारतीय कर्णधाराविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या तो प्रयत्नात असेल.

4. मिशेल स्टार्क

स्टार्कने आयपीएल 2020 मधून बाहेर राहीला असला तरी तो भारताविरुद्ध आगामी वनडे मालिकेत कहर निर्माण करण्यास तयार आहे. इंग्लंडविरुद्ध सप्टेंबर महिन्यात झालेल्या वनडे मालिकेच्या मालिकेत स्टार्कने तीन सामन्यात पाच गडी बाद केले होते. 11 सामन्यांत 16 विकेट्ससह स्टार्कने भारताविरूद्ध यशाची चव चाखली आहे. नवीन चेंडूसह स्टार्क मर्यादित ओव्हर मालिकेत भारतीय अव्वल फळीला त्रास देऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे सामन्यांची मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होईल. मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवले जातील, तर तिसरा आणि अखेरचा सामना 2 डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे आयोजित होणार आहे.