अजिंक्य रहाणे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS Brisbane Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील ब्रिस्बेन कसोटी (Brisbane Test) सामन्यावरील वाद आता संपुष्टात आला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेचा अंतिम चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळला जाईल याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) पुष्टी केली आहे. 15 जानेवारीपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ मंगळवार, 12 जानेवारी रोजी तिथे जाण्यासाठी रवाना होतील. यासंन्यासाठी राज्य सरकारकडून काही बदल करण्यात आले आहेत. क्वीन्सलँड सरकारने (Queensland Government) गब्बा (Gabba) येथे होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम टेस्ट मॅचसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीची संख्या 50 टक्क्यांवर आणली आहे. शिवाय, स्टेडियम जवळ फिरणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. दौर्‍यावरील भारतीय संघाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मंगळवारी तेथे उड्डाण करणार असल्याची माहिती दिल्यानंतर ब्रिस्बेन कसोटी वेळापत्रकानुसार खेळले जाणार असल्याचं ठरलं. (IND vs AUS Brisbane Test 2021: क्वीन्सलँड सरकार जाहीर केला नवीन तीन दिवसांचा लॉकडाउन, चौथा ब्रिस्बेन टेस्ट रद्द होण्याच्या उंबरठ्यावर)

क्विन्सलँड प्रीमियर Annastacia Palaszczuk यांनी ब्रिस्बेनच्या मागील आठवड्यात इंग्लंडच्या नवीन कोविड-19 स्ट्रेनच्या सकारात्मक घटना समोर आल्यावर तीन दिवसांच्या लॉकडाउनला दुजोरा दिला आहे. राज्य सरकारने मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रत्येक दिवशी 20,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. "गाब्बा अर्ध्या क्षमतेने भरले जाईल आणि स्टेडियममध्ये प्रवेश, सोडण्यासाठी आणि फिरण्यासाठी मुखवटे अनिवार्य आहेत," Palaszczuk यांनी सांगितले. दुसरीकडे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की चाहते, कर्मचारी, खेळाडू, अधिकारी आणि प्रसारकांची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे. "आम्ही क्वीन्सलँड आरोग्यासह जवळून कार्य करीत आहोत यासाठी की आमच्या मजबूत बायोसिक्युरीटी योजना गब्बा येथे होणारी चौथी कसोटी सामना सुरक्षितपणे खेळला जाण्याची हमी देते."

ब्रॅस्बेन कसोटी सामना मागील काही दिवसापासून चर्चेचा विषय बनला होता. टीम इंडियाच्या एका सूत्राने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, क्वारंटाइनच्या निर्बंधांमुळे भारतीय संघ ब्रिस्बेनला जाऊ इच्छित नाही. यानंतर क्वीन्सलँड सरकारने त्याबद्दल नाराजी व्यक्त करत एक निवेदन जारी करत म्हटले होते की, टीम इंडियाला नियमानुसार खेळायचे नसल्यास त्यांना येथे येण्याची गरज नाही. सध्या चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी असून सिडनी येथे तिसरा सामना खेळला जात आहे.