India vs Australia 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये पाऊस, अपुरा प्रकाश यामुळे चौथ्या दिवशी अनेक व्यत्यय आले. आज सकाळी पावसामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. त्यानंतर पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर रोखण्यात भारताला यश आल्यानंतर त्यांच्यावर फॉलो ऑनची (follow on) नामुष्की ओढावली आहे. अंधुक प्रकाशामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज बिनबाद 6 धावांवर आहे. सध्या ऑस्ट्रेलिया 316 धावांनी पिछाडीवर आहे.
दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची एकही विकेट गेली नव्हती. दुसऱ्या दिवस अखेर 24 धावा करत दिवस संपला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने ऑस्ट्रेलियाला दिवसाची सुरुवात करून दिली मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पटापट विकेट गेल्या. मात्र तिसरा दिवसही अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवून संपवण्यात आला. चौथ्या दिवशी भारताने 300 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखले. फॉलो ऑनमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सध्या सुरु आहे. India vs Australia 4th Test: KL Rahul च्या सिडनी मैदानावरील Sportsman Spirit चं अंपायर सह प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक
भारताकडून चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत या फलंदाजानी दमदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. भारत मजबूत स्थितीमध्ये असून मोठ्या फरकाने यजमानाच्या देशातच कसोटी सीरिज जिंकण्याची किमया भारतीय संघ दाखवण्याच्या तयारीत आहे.