IND vs AUS 4th Test 2021: शुभमन गिलचं शतक हुकलं पण दुसऱ्या डावात टीम इंडियाचा दबदबा, ब्रिस्बेन टेस्टमध्ये विजयसापासून 145 धावा दूर
चेतेश्वर पुजारी आणि शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) संघातील ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) चहापानाची वेळ घोषित झाली आहे. शुभमन गिलच्या (Shubman Gill) 91 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या डावात दबदबा कायम ठेवला असून अंतिम सत्रात त्यांना आता विजयासाठी 145 धावांची गरज आहे तर त्यांच्याकडे 7 विकेट शिल्लक आहेत. चहापानाच्या वेळेपर्यंत टीम इंडियाने 3 विकेट गमावून 183 धावा केल्या आहेत. शुभमनने सर्वाधिक धावा केल्या तर रोहित शर्मा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. दुसऱ्या डावाच्या शेती चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 43 धावा आणि रिषभ पंत (Rishabh Pant) 10 धावा करून खेळत होते. रोहितनर 7 धावांच करू शकला तर रहाणेने 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने 2 तर नॅथन लायनला 1 विकेट मिळाली आहे. भारतीय संघासमोर विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य आहे. (IND vs AUS 4th Test Day 5: शुभमन गिल डेब्यू मालिकेत ‘नर्व्हस 90’ चा शिकार, काही धावांनी शतक हुकले पण जिंकली चाहत्यांची मनं, पहा Tweets)

328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का उपकर्णधार रोहित शर्माच्या रूपात बसला जो पाचव्या दिवशी जास्त फलंदाजी करू शकला नाही. वैयक्तिक 7 धावांवर कमिन्सने भारतीय ओपनरला विकेटच्या मागे कर्णधार टिम पेनच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर, शुबमन गिलने चेतेश्वर पुजारासह डाव पुढे नेला आणि या दौर्‍यावर दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने 90 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शुभमन आणि पुजाराची दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीने सामान्यचे चित्र बदलून टाकले. पुजारा संथ खेळी करत असताना शुभमनने आक्रमक पण संयमी खेळी केली. यादरम्यान शुभमनने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. मात्र, शुभमनचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक काही धावांनी हुकले. नॅथन लायनने त्याला आपल्या फिरकीत अडकवले 91 धावांवर माघारी धाडलं. 22 चेंडूत 24 धावांचा वेगवान खेळी खेळल्यानंतर कर्णधार रहाणे कमिन्सच्या चेंडूवर पेनकडे झेलबाद झाला.

यजमान संघाने पहिल्या डावात मार्नस लाबूशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर 369 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकांच्या मदतीने भारताने पहिल्या डावात 336 धावा केल्या. दुसर्‍या डावात 33 धावांनी आघाडी घेत कांगारू संघाने 294 धावा केल्या. अशा प्रकारे भारतीय संघाला 328 धावांचे लक्ष्य मिळाले.