IND vs AUS 4th Test Day 5: शुभमन गिल डेब्यू मालिकेत ‘नर्व्हस 90’ चा शिकार, काही धावांनी शतक हुकले पण जिंकली चाहत्यांची मनं, पहा Tweets
शुभमन गिल (Photo Credit: Facebook)

IND vs AUS 4th Test Day 5: टीम इंडियाचा (Team India) 21 वर्षीय सलामी फलंदाज शुभमन गिलने (Shuman Gill) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली कामगिरी उंचावत ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा येथे सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) टेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यात तुफानी डाव खेळला. कांगारू संघाविरुद्ध चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने 146 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 2 षटकार खेचले पण या युवा खेळाडूचे दुर्दैव म्हणजे आपल्या डेब्यू कसोटी सामन्यात तो ‘नर्व्हस 90’ चा शिकार झाला 91 धावा करून माघारी परतला. नॅथन लायनच्या (Nathan Lyon) फिरकीमध्ये शुभमन अडकला आणि विकेटच्या मागे ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे शुभमनचा जबरा डाव संपुष्टात आला. यासह शुभमनने भारताकडून आपल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 259 धावा केल्या. शुभमनचे पहिले कसोटी शतक लांबणीवर गेले असले तरी त्याने आपल्या खेळीने यूजर्सची मनं नक्कीच जिंकली. युवा भारतीय फलंदाजाच्या कामगिरीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले जात आहे. (IND vs AUS 4th Test Day 5: शुभमन गिलचा मास्टर स्ट्रोक, सुनील गावस्कर यांना मागे टाकत केला कमाल, काय ते जाणून तुम्हीही कराल कौतुक)

रोहित शर्मा दिवसाच्या पहिल्या सत्रात स्वस्तात बाद झाल्यावर शुभमनने चेतेश्वर पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीत करत भारताचा डाव सावरला. दोघांमध्ये 114 धावांची भागीदारी झाली ज्यामुळे संघाने कांगारू गोलंदाजांवर दबाव आणला. शुभमनने आपल्या खेळी मिचेल स्टार्कच्या ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या ज्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. पुजारा आपला संयमी खेळ करत असताना शुभमनने संयम आणि आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. शुभमनने मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. यापूर्वी, युवा सलामी फलंदाजाने सिडनीच्या पहिल्या डावात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते.

गिल हे भविष्य आहे ...

गंभीर खेळाडू !!

उत्कृष्ट!

तो एक मोठी गोष्ट आहे

गिल नर्व्हस 90 वर आऊट

चांगला खेळ

शानदार डाव

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य आहे आणि पाचव्या दिवशी विजय मिळवण्याची अंतिम संधी आहे. ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा त्यांच्या घरी पराभवाची धूळ चारत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताचे 8 विकेट शिल्लक असून अद्याप 43 ओव्हरचा खेळ बाकी आहे.