IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) अंतिम दिवशी शिस्तबद्ध कामगिरीने टीम इंडियाला (Team India) कांगारू देशात सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) टेस्ट मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारतीय संघाने (Indian Team) सलग तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी संघाने 2016-17 मध्ये देशात आयोजित त्यानंतर 2018-19 आणि 2020-21 मध्ये डाऊन अंडर विजय मिळवण्याचा कारनामा केला आहे. टीम इंडियासाठी हा मालिका विजय अनेक मानाने खास ठरला. मालिकेची पराभवाने सुरुवात करत संघाला विजयाच्या प्रवासापर्यंत अनेक खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागले. शिवाय, नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील पितृत्व रजेसाठी मायदेशी परतला होता. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) नेतृत्वाची जबाबदारी चोख बजावली आणि संघाचे विजयी नेतृत्व केले. यासह रहाणेने डाऊन अंडर कसोटी मालिका जिंकणारा फक्त दुसरा भारतीय कर्णधार ठरला. (IND vs AUS 4th Test 2021: शुभमन गिलची जबरा बॅटिंग, रिषभ पंतच्या अर्धशतकने टीम इंडियाचा 2-1ने रोमहर्षक विजय, Gabba येथे ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षात पहिला पराभव)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकणारा विराट पहिला भारतीय कर्णधार होता. विराटच्या नेतृत्वात 2018-19 दौऱ्यावर सिडनी टेस्ट सामना पावसामुळे ड्रॉ राहिल्याने चार सामन्यांच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-1 ने पहिल्यांदा कांगारू संघाला त्यांच्याच देशात पराभवाची धूळ चारली होती. आणि आता रहाणेच्या नेतृत्वात देखील भारतीय संघाने 2-1 असा रोमहर्षक विजय मिळवत रेकॉर्ड-ब्रेक कामगिरीची नोंद केली. टीम इंडियाच्या विजयात रहाणेचे नेतृत्व आणि नवख्या खेळाडूंच्या दमदार खेळीने निर्णायक भूमिका बजावली. मुख्य गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिजर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारख्या नवोदित गोलंदाजांनी जबाबदारी सांभाळली तर फलंदाजीत शुभमन गिल, रिषभ पंतने मोलाचा वाट उचलला. सिराजने टेस्टमध्ये पहिल्यांदा 5 विकेट काढल्या तर शार्दूल-सुंदरच्या शतकी भागीदारीने संघाचे आव्हान कायम ठेवले होते.
ब्रिस्बेनच्या गब्बा येथे झालेल्या सामन्यात शुभमनने सर्वाधिक 91 धावा केल्या तर चेतेश्वर पुजाराने त्याला चांगली साथ दिली आणि शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. पुजाराने या दरम्यान 28वे कसोटी अर्धशतक करत 56 धावा केल्या. दुसरीकडे, गब्बा येथे यजमान संघाचा 32 वर्षातील पहिला पराभव ठरला. यापूर्वी, कांगारू संघाचा 1988 मध्ये दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 9 विकेटने धुव्वा उडवला होता. त्यावेळी, विव्हियन रिचर्ड्स आणि अॅलन बॉर्डर यांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते.