Ind Vs Aus 4th ODI 2019: 'एश्टन टर्नर' ने फिरवली मॅच, ऑस्ट्रेलिया संघाने 'टीम इंडिया' वर केली 4 विकेट्सने मात
Ind Vs Aus (Photo Credits: Twitter/BCCI)

India Vs Australia Mohali ODI 2019:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली आहे. पाच सामन्याच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 2-2असे बरोबरीमध्ये आहेत. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. 359 धावांचा लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होत. ऑस्ट्रेलिया संघाने अडखळत सुरुवात केली असली तरीही मॅच जिंकली. या सामन्यात 4 विकेटसने भारतावर विजय मिळवला आहे. एश्टन टर्नर (Ashton turner)  मॅन ऑफ द मॅच ठरला.

ऍश्टन टर्नरने ३३ चेंडूत अर्धशतक केले आणि ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या टप्यात त्याची विकेट्स भारतीय क्रिकेट संघाने दोनदा गमावली. आणि ही चूक भारताला महागात पडली. ऑस्ट्रेलिया संघाने इतका मोठा टप्पा पार केला. Ind Vs Aus 4th ODI 2019: 'शिखर धवन' चं वन डे करियरमधील सगळ्यात दमदार शतक, रोहित शर्मा सोबत विक्रमी खेळी

भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्माने दमदार कामगिरी केली. शिखर धवनने सर्वाधिक १४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर इतकी मोठी धावसंख्या उभी केल्यानांतर भारत जिंकेल असे अनेकांना वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने इतकी मोठी धावसंख्या पार केली आणि भारतावर विजय मिळवला. पुढील आणि अंतिम सामना दिल्लीला फिरीजशहा कोटला येथे रंगणार आहे. हा अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. या दौऱ्यातील T20 सिरीज ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.