Ind Vs Aus 4th ODI 2019: 'शिखर धवन' चं वन डे करियरमधील सगळ्यात दमदार शतक, रोहित शर्मा सोबत विक्रमी खेळी
Shikhar Dhawan (Photo Credits: Twitter/ BCCI)

India Vs Australia Mohali ODI 2019: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा चौथा आणि अटीतटीचा एकदिवसीय सामना सध्या मोहालीमध्ये सुरु आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan)  आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या दमदार खेळीने भारत मजबूत स्थितीमध्ये आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 31 षटकांत 193 धावांची भागिदारी केली. शंभरीच्या उंबरठ्यावर असताना रोहित शर्मा 95 आउट झाला असला तरीही 'गब्बर' शिखर धवनने मात्र शतकी खेळी केली आहे. शिखर धवन 143 धावांवर आऊट झाला आहे. त्याने 115 चेंडूत 18 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 143 धावांची खेळी केली.

भारतीय क्रिकेट संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 5  एकदिवसीय सामन्याच्या या सिरीजमध्ये भारत 2-1  अशा आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याकडे भारताचं लक्ष असेल. आजच्या सामन्यात धोनीला आराम देऊन रिषभ पंत कडे विकेट कीपिंगची जबाबदारी दिली आहे.