रवींद्र जडेजाच्या चूक थ्रो ने स्टिव्ह स्मिथ रनआऊट (Photo Credit: Twitter)

Ravindra Jadeja Runs Out Steve Smith: भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलिया (Australia) दौर्‍यावर चांगली कामगिरी बजावत आहे. सिडनी (Sydney) येथे सुरु असलेल्या मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने पुन्हा आपली ताकद दाखविली. तिसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सिडनीमध्ये जडेजाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले की सध्याच्या क्षणी तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये का गणला जातो आणि त्याच्या थ्रोचे सोशल मीडियावर नेटकरीच नाही तर एकेकाळी त्याच्यावर टीका करणारे देखील कौतुक करत आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने केवळ चेंडूनेच चमक दाखविली नाही तर मैदानावरील फिल्डिंगसाठी देखील त्याचे कौतुक केले जात आहे. जडेजाने भारताच्या डावात सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 18 ओव्हरमध्ये 62 धावा देत चार गडी बाद केले आणि संघाचं टेंशन हलकं केलं. शानदार गोलंदाजीनंतर जडेजाने कांगारू संघाच्या शतकवीर स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) अप्रतिम थ्रोने  रनआऊट केले ज्याची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. (IND vs AUS 3rd Test: ‘सचिन की विराट तुझा आवडता कोण?’ Marnus Labuschagne याच्या प्रश्नावर शुभमन गिलने दिली मजेदार रिअक्शन, पहा Video)

जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन डावाच्या 106वी ओव्हर टाकायला आला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्मिथने डीप स्क्वेअर लेगकडे शॉट मारला. या दरम्यान, स्मिथला दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि चोरटी धाव घेण्यासाठी धावला, मटार बाउंड्री लाईनवरून जाडेजा वेगाने धावत आला. जडेजाने धावतच चेंडू उचलला आणि थेट स्टंपचा वेध घेत स्मिथला बाद केलं. स्मिथच्या विकेटसोबत ऑस्ट्रेलियाचा डावही संपुष्टात आला. पहा स्मिथच्या रनआऊटचा हा व्हिडिओ:

यानंतर नेटकऱ्यांनी जडेजावर कौतुकाचा वर्षाव केला आणि त्याची आपली गोलंदाजी व क्षेत्ररक्षण ही भारतीय संघासाठी किती मोलाची आहे याची पुन्हा एकदा निवडकर्त्यांना आठवण करून दिली. विशेष म्हणजे जडेजाचे कौतुक करणाऱ्यांमध्ये भाष्यकर्ते संजय मांजरेकर देखील सामील आहे.

एकदम हुशार! 

मास्टरक्लास ...!

अविश्वसनीय कामगिरी 

सर जडेजाचा प्रभाव

सर जडेजा

अचूक थ्रो

मात्र, स्मिथने बाद होण्यापूर्वी कसोटी कारकीर्दीचे 27वे कसोटी शतक ठोकले. 31 वर्षीय कांगारू फलंदाजाचे भारताविरुद्ध 8वे शतक होते. स्मिथ आता भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक झळकावणारा संयुक्तपणे आघाडीचा फलंदाज बनला आहे. स्मिथने 226 चेंडूत 131 धावा केल्या आणि आपल्या डावात 16 चौकार ठोकले.