मार्नस लाबूशेन आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 3rd Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी (Sydney) येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी यजमान कांगारू संघाचा पहिला डाव 338 धावांवर संपुष्टात आणल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये लाबूशेन शुबमनला त्याच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारले ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या युवा सलामी फलंदाजाने दिलेली रिअक्शन ऐकून तुम्ही देखील म्हणाल- 1 नंबर! भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा बँटर्सची कमतरता भासत नाही. यापूर्वी टिम पेन आणि रिषभ पंत यांच्यात कांगारूंच्या दौऱ्यादरम्यान बेबी-सीटिंगची घटना घडली. एससीजी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात शुभमन आणि लाबूशेन यांच्यात भारताच्या डावातील तिसर्‍या ओव्हरमध्ये मैत्रीपूर्ण संभाषण रंगले. (IND vs AUS 3rd Test Day 2: स्टिव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाची त्रिशतकी मजल, भारताविरुद्ध सिडनी टेस्टच्या पहिल्या डावात केल्या 338 धावा)

भारताच्या पहिल्या डावात गिल 4 धावा करून फलंदाजी करत असताना शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या लाबूशेनले टीम इंडिया फलंदाजाचा आवडता खेळाडू कोण, असे विचारले. शुभमनने त्याला प्रत्युत्तर देत त्याला सांगितले की तो मॅचनंतर त्याला आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल सांगेल. शॉर्ट लेगवर उभे असलेल्या लाबूशेनने विचारले, "तुझा आवडता खेळाडू कोण आहे? सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली." यावर शुभमनने रिअक्शन देत म्हटले, "मी नंतर सांगतो." याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, लाबूशेन इथेच थांबला नाही तर त्याने रोहितला देखील विचलित करण्याचा प्रयत्न केला. जोश हेझलवूडचा चेंडू डॉज केल्यावर लाबूशेनने रोहितला "तू क्वारंटाइनमध्ये काय केले?" असे विचारले, मात्र शुभमनप्रमाणे रोहितने ऑस्ट्रेलियन खेळाडूला प्रतिक्रिया दिली नाही. पहा लाबूशेनचा हा व्हिडिओ:

तिसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 338 धावांवर ऑलआऊट झाला. कांगारू संघासाठी स्टीव्ह स्मिथने 27वे कसोटी कसोटी शतक झळकावले. स्मिथ 226 चेंडूंमध्ये 131 धावा करून माघारी परतला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 172 धावांवर 8 गडी गमावले. दुसरीकडे, टीम इंडियाकडून जडेजाने सर्वाधिक 4, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली.