
IND vs AUS 3rd Test Day 3: ऑस्ट्रेलिया (India) आणि भारतीय संघातील (Indian Team) सिडनी टेस्टच्या (Sydney Test) तिसऱ्या दिवसाखेर यजमान संघाने दुसऱ्या डावात 2 विकेट गमावून 103 धावा केल्या आणि टीम इंडियाविरुद्ध 197 धावांनी मजबूत आघाडी घेतली आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत कांगारू संघाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली त्यानंतर पॅट कमिन्स आणि अन्य गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पदार्पणवीर विल पुकोवस्की 10 तर डेविड वॉर्नर 13 धावाच करू शकला. यापूर्वी, पुकोवस्कीने पहिल्या डावात अर्धशतकी डाव खेळत 62 धावा केल्या होत्या. दिवसाखेर स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) नाबाद 2 धावा आणि मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) नाबाद 47 धावा करून परतले. भारताकडून तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन (R Ashwin) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. पहिल्या डावाच्या जोरावर 96 धावांची आघाडी घेतली. (IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाला मोठा धक्का, रिषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला; रिद्धिमान साहा दुसर्या डावात करणार विकेटकीपिंग)
तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, दिवसाच्या पहिल्या सत्रात रहाणे आणि नंतर हनुमा विहारीची विकेट गमावली. त्यानंतर रिषभ पंतच्या साथीने पुजाराने डाव पुढे नेला. पुजाराला धावांची संघर्ष करावा लागत असताना पंत आक्रामक फलंदाजी करत राहिला. या दरम्यान, पंतच्या एल्बोला दुखापत झाल्यानंतर तो फलंदाजी दरम्यान अस्थिर दिसला आणि हेझलवूडच्या चेंडूवर वॉर्नरकडे झेलबाद झाला. पंतने 36 धावा केल्या. त्यानंतर पुजाराने 174 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कसोटी इतिहासातील कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात संथ अर्धशतक होते. आर अश्विन दहा धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर नवदीप सैनी देखील माघारी परतला. जसप्रीत बुमराह भारतीय डावात धावबाद होणार सरा फलंदाज ठरला. यापूर्वी, भारताकडून रोहित शर्माने 26 तर शुभमन गिलने पहिले आंतरराष्ट्रीय शतकी खेळी केली. गिलने 101 चेंडूंत 8 चौकारांसह 50 धावा केल्या. रविंद्र जाडेजाने अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद 28 धावांची खेळी केली.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी दोन मोठ्या शतकी भागिदारी झाल्या. लाबुशेन-पुकोवस्की आणि स्मिथ-लाबुशेन यांच्यामध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांच्या भागिदारी झाल्या. मात्र, भारतीय फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करता आली नाही. रोहित शर्मा-शुबमन गिल यांच्यात झालेली 70 धावांची भागिदारी भारताची सर्वात मोठी भागिदारी ठरली. त्यानंतर, पंत-पुजारा यांच्यात 53 धावांची भागिदारी झाली.