IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी टेस्टच्या (Sydney Test) पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाचा (Team India) युवा फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कोपऱ्याला दुखापत झाल्याने त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहेत. अशा स्थितीत पंतच्या जागी आता रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळत आहे. "शनिवारी दुसर्या सत्रात फलंदाजी करताना रिषभ पंतला डाव्या कोपरात फटका (Rishabh Pant Elbow Injury) बसला. त्याला स्कॅनसाठी घेण्यात आले आहे," बीसीसीआयने (BCCI) ट्विट केले. उजव्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानंतर पंत फलंदाजी करताना अस्वस्थ दिसला. काही मिनिटांसाठी फिजिओने त्याच्या दुखापतीची तपासणी केली. त्याने फलंदाजी पुन्हा सुरू केली पण पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यांच्या बाऊन्सर्सपुढे संघर्ष करताना दिसला. लंचनंतरच्या सत्रात हेझलवूडने पंतला 36 धावांवर बाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. दरम्यान, टीम इंडिया 244 धावांवर ऑलआऊट झाली आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या जोरावर 94 धावांची आघाडी घेतली. (IND vs AUS 3rd Test 2021: चेतेश्वर पुजाराने ठोकले सर्वात मंद अर्धशतक, रिषभ पंतने दिग्गजांना मागे टाकत ऑस्ट्रेलियामध्ये केली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी)
पॅट कमिन्सचा शॉर्ट बॉल पंत खेळू शकला नाही जो त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला लागला. फिजिओ मैदानावर त्याची दुखापत तपासण्यासाठी मैदानावर आल्यानंतर त्याला भरपूर वेदना होत असल्याचे दिसून आले मात्र त्याने हाताला पट्टी लावत थोड्या वेळ फलंदाजी केली. पंतने डावाची आक्रामक सुरुवात केली पण दुखापतीनंतर त्याची गती मंदावली आणि अखेर हेझलवूडच्या चेंडूवर विकेटच्या मागे टिम पेन याच्याकडे झेलबाद झाला. पहिल्या डावात दोन झेल सोडल्यामुळे पंतची विकेटकिपिंग रडारवर आली होती. मालिकेच्या सुरूवातीस साहा विकेटकिपिंगसाठी पहिली पसंत होता, पण सर्वोत्तम फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या मेलबर्न येथील कसोटी सामन्यासाठी पंतची निवड करण्यात आली.
Rishabh Pant was hit on the left elbow while batting in the second session on Saturday. He has been taken for scans. #AUSvIND pic.twitter.com/NrUPgjAp2c
— BCCI (@BCCI) January 9, 2021
दरम्यान, डावाच्या अखेरीस मिचेल स्टार्कचा घातक चेंडूने रवींद्र जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर फटका बसला. मात्र, जडेजाने देखील दुखापतीनंतर खेळणे सुरु ठेवले आणि 37 चेंडूत नाबाद 28 धावा करून परतला. जाडेजा गोलंदाजीस फिट आहे का हे पाहणे अद्याप शिल्लक आहे. यापूवी, जडेजाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा शतकवीर स्टीव्ह स्मिथला धावबाद करत एकूण चार विकेट घेतल्या होत्या.