IND vs AUS 3rd Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशीच्या लंचची वेळ झाली आहे. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशीच्या जेवणापूर्वी यजमान संघाने 5 विकेट गमावून 249 धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) सुरु गवसला असून तो नाबाद 76 धावा करून खेळत आहेत. मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) 91 धावा करून माघारी परतला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताकडून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना यश मिळाले. जडेजाने 2 तर बुमराहने लुंचपूर्वी कॅमरुन ग्रीनला शून्यावर बाद करत डावात पहिली विकेट मिळवली. मॅथ्यू वेड 13 धावा करून माघारी प्रतला. यापूर्वी, पहिल्या दिवशी कांगारू संघाचा पदार्पणवीर विल पुकोवस्कीने 62 धावांचे योगदान दिले. पहिल्या दिवसाखेर मोहम्मद सिराज आणि नावादीप सैनी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली, मात्र दुसऱ्या दिवशी दोघे काही कमाल करू शकले नाही. (IND vs AUS 3rd Test Day 2: SCG मध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला; स्टिव्ह स्मिथचे अर्धशतक)
यजमान ऑस्ट्रेलियाने 2 बाद 166 धावांपासून पुढे खेळण्याची सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी झालेल्या पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दुसर्या दिवशी अर्धा तास आधी सामना सुरू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशीही पाऊस लपाछपीचा खेळ खेळत राहिला. पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात लाबूशेन-स्मिथ यांच्यातील शतकी भागीदारीने संघाची धावसंख्ये दोनशे पार नेली. या दरम्यान, लाबूशेनने मालिकेतील पहिले शतक ठोकले, पण त्याचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. जडेजाचा चेंडू कांगारू फलंदाजाच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये थेट अजिंक्य रहाणेच्या हातात गेला. त्यानंतर स्मिथने चौकार खेचत कसोटी कारकीर्दीतील 30वे अर्धशतक तर मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 116 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतकी धावसंख्या गाठली. मॅथ्यू वेडने आक्रमक वृत्ती दर्शविली पण 16 चेंडूत 13 धावा करून जडेजाच्या चेंडूवर बुमराहकडे झेलबाद झाला. कॅमरून ग्रीनला पायचीत करत बुमराहने भारताला पाचवे यश मिळवून दिले.
दुसरीकडे, पहिल्या दिवशी दुखापतीतून पुनरागमन करणारा डेविड वॉर्नर केवळ 5 धावाच करू शकला तर कसोटीत पदार्पण करणारा दुसरा सलामी फलंदाज विल पुकोव्स्कीने 62 धावा केल्या.