IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) कॅनबेरा (Canberra) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 63 धावांवर बाद होताच भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) प्रत्येक वर्षात वनडे शतक करण्याची मालिका अखेर 11 वर्षानंतर संपुष्टात आली. विराटने आजवर आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीत 43 शतकांची नोंद केली आहे. विराटने 2008 मध्ये वनडे डेब्यू केले होते आणि संपूर्ण वर्षात त्याने शतक केले नव्हते. कोहलीने डिसेंबर 2009 मध्ये ईडन गार्डन्स येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) आपले पहिले एकदिवसीय शतक केले होते आणि त्यानंतर पुढील कॅलेंडर वर्षात शतकी खेळ धावा करण्यात तो कधीही अपयशी ठरला नाही. गेल्या तीन वर्षांत तो इतका चांगला फॉर्मात आहे की त्याने फक्त 2017 पासून आतापर्यंत 17 शतकं- 2017 मध्ये सहा, 2018 मध्ये सहा आणि 2019 मध्ये 5 शतकी डाव खेळले आहेत. अर्थात, कोरोना व्हायरसने प्रेरित कोहलीच्या कुप्रसिद्ध विक्रमाचे कारण म्हणजे यावर्षी त्याने कमी वनडे सामनेदेखील खेळले आहेत. (IND vs AUS 3rd ODI: विराट कोहली ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिनच्या वरचढ! 12,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा बनला सर्वात जलद ‘रनमशीन’)
तथापि, बुधवारी मनुका ओव्हलमध्ये विराट कोहलीला आणखी एक मैलाचा दगड गाठला, ज्याचा त्याला नक्की अभिमान वाटेल. 12,000 एकदिवसीय धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला. आपल्या 251व्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजाने मैलाचा दगड गाठला आणि 309 सामन्यात कामगिरी बजावलेल्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. यापूर्वी, रविवारी सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात कोहली 22,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा देखील वेगवान फलंदाज ठरला होता. सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत कोहली सभ्य कामगिरी केली आहे. त्याने सिडनीमधील पहिल्या सामन्यात 21, दुसर्या सामन्यात टीम इंडिया कर्णधाराने 89 धावा ठोकल्या आणि त्याने जोरदार फटकेबाजी केली पण अनुक्रमे 375 आणि 390 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
Virat Kohli's Highest ODI Score
2008 - 54
2009 - 107
2010 - 118
2011 - 117
2012 - 183
2013 - 115*
2014 - 139*
2015 - 138
2016 - 154*
2017 - 131
2018 - 160*
2019 - 123
2020 - 89#INDvAUS
— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) December 2, 2020
शिवाय, 2020 कोहलीसाठी इतके चांगले वर्ष सिद्ध झाले नाही. आशियाई दिग्गज म्हणून भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये 3 आणि ऑस्ट्रेलियामध्ये सलग 2 असे सलग 5 वनडे सामने गमावले आहेत. आणि आजच्या सामन्यात देखील पराभव झाल्यास विराट नकोश्या विक्रमाची नोंद करत 1981मध्ये सुनील गावस्कर यांच्यानंतर 5 पेक्षा जास्त सलग एकदिवसीय सामने गमावणार तो पहिला भारतीय कर्णधार बनू शकतो.