भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने ऑस्ट्रेलियाच्या मधल्याफळीतील मार्नश लाबूशेन (Marnus Labuschagne) याचा जबरदस्त कॅच पकडून पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. टीम इंडियाविरुद्ध मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लाबूशेनने राजकोट आणि आता बेंगळुरू सामन्यात प्रभावी कामगिरी केली. राजकोटमध्ये लाबूशेन 46 धावा करून बाद झाला. पण, आज त्याने चूक न करता वनडेमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. लाबूशेनने 60 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक साजरे केले. त्याने स्टिव्ह स्मिथ याच्या साथीने शतकी भागीदारी करत संघाला मुश्किल परिस्थितीतून बाहेर काढले आणि संघाचा डाव सावरला. स्मिथ-लाबूशेनने तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. (Video: टीम इंडियाविरुद्ध स्टीव्ह स्मिथ याने कर्णधार आरोन फिंच ला केले रनआऊट, संतप्त ऑस्ट्रेलियाई कर्णधाराने वापरले अपशब्द)
ऑस्ट्रेलियाची ही जोडी भारतासाठी धोकादायक ठरत असताना 32 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने लाबूशेनला कर्णधार कोहलीकडे कॅच आऊट केले. लाबूशेनने आज 54 धावा केल्या. कोहलीने पकडलेला कॅच पाहून सर्व हैराण झाले. ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडणे अत्यंत आवश्यक होते. दोन्ही फलंदाज विकेटवर स्थायिक झाले होते. मात्र, लाबूशेनला बाद केल्यावर विराटने माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याच्या 'कॅप सेलिब्रेशन'चे अनुकरण केले. पाहा हा व्हिडिओ:
Watch out! Superman Virat on the ground.
This catch from #KingKohli we can totally watch it on loop
📽️📽️https://t.co/8IKxy86WoX #INDvAUS pic.twitter.com/tpZGMLci70
— BCCI (@BCCI) January 19, 2020
बेंगळुरूमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंचने टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने या मालिकेत प्रत्येकी एक-एक सामने जिंकले आहे. आजचा सामना निर्णायक आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो मालिकेत खिशात घालेल.