Video: टीम इंडियाविरुद्ध स्टीव्ह स्मिथ याने कर्णधार आरोन फिंच ला केले रनआऊट, संतप्त ऑस्ट्रेलियाई कर्णधाराने वापरले अपशब्द
आरोन फिंच (Photo Credit: PTI)

टीम इंडिया (India) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील दुसऱ्या सामन्यात धावबाद झाला. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) च्या एका चुकीमुळे फिंच धावबाद झाला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार खूप संतापला आणि त्याने आपल्या संघाचा नंबर एक फलंदाज आणि माजी कर्णधार स्मिथलाही शिवीगाळ केली. फिंच 19 धावा काढून बाद झाला. स्मिथ आणि फिंच यांच्यात खेळपट्टीवर गैरसमज झाला त्यानंतर फिंचला आपली विकेट गमवावी लागली. दोन्ही संघात तिसरा वनडे सामना खेळत आहेत. दोन्ही संघ मालिका प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरीत आहे. आजचा सामना निर्णायक आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय वेगवान गोलंदाजांनी संघाला लवकर दोन यश मिळवून दिले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला यष्टीरक्षक केएल राहुलकडे कॅच आऊट केले. 18 धावांवर ऑस्ट्रेलियाची विकेट पडली. (IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्ध बेंगळुरू वनडे सामन्यात टीम इंडियाने घातले ब्लॅक बँड, जाणून घ्या कारण)

यानंतर 9 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर स्मिथने ऑफ साईडमध्ये चेंडू मारला आणि धाव धावला घेण्यासाठी धावला, पण रवींद्र जडेजा ने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने वेगाने धाव घेतली आणि चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. जडेजाचा वेग पाहून स्मिथ मागे परतला, मात्र फिंच तोवर स्ट्राईक स्टंपपर्यंत पोहचला होता. अश्या परिस्थितीत स्मिथ मागे परतताना पाहून फिंच नॉन-स्ट्राइकच्या दिशेने पळाला, पण परत जाण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हती. श्रेयस अय्यर ने जडेजाचा थ्रो पकडला आणि शमीकडे फेकला, ज्याने फिंचला धावबाद केले. बाद झाल्याने फिंच अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने स्मिथकडे पाहून त्याला शिवीगाळ केली. स्मिथलाही त्याच्या चुकीबद्दल खेद वाटला. पाहा हा व्हिडिओ:

या धावचीतमध्ये स्मिथने चूक केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. समालोचक हरभजन सिंहनेही म्हटले की स्मिथने तीन-चार पावलं धावला आणि मागे परतला. म्हणून यात त्याची चूक आहे. याच कारणामुळे फिंच पॅव्हिलिअनकडे परताना रागावला.