आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) 14 दिवसाच्या क्वारंटाइन नियमाचे पालन करावे लागेल, पण त्यांचे क्रिकेटपटूंना शक्य तितकी तयारी करता येईल याची व्यवस्था केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मंगळवारी सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांनी त्यांचे खेळाडू इतक्या दूर जाऊन फक्त हॉटेलच्या खोल्यांमध्ये बसायला नको असे सांगत संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर खेळाडूंसाठी थोडासा वेगळा क्वारंटाइन कालावधी मागितला होता, पण आता ऑस्ट्रेलिया बोर्डाने कथितपणे नकार दिला आहे. नवनियुक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी दोन आठवड्यांचा क्वारंटाइन असणे आवश्यक आहे परंतु प्रशिक्षण सुविधांशिवाय नाही यावर भर दिला. (IND Tour of AUS 2020: ‘दोन आठवडय़ांचा क्वारंटाइन अतिशय निराशाजनक', ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमात बदल करण्याची BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मागणी)

ESPNCricinfo शी बोलताना हॉकली म्हणाले की सीए सुनिश्चित करेल की क्वारंटाईन झोनमध्ये खेळाडूंना उत्तमोत्तम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध असतील ज्यामुळे त्यांना सामन्यांसाठी सर्वोत्तम पद्धतीने तयारी करता येईल. "दोन आठवड्यांच्या क्वारंटाइन खूपच चांगल्या प्रकारे परिभाषित केला गेला आहेत," हॉकली म्हणाले. " क्वारंटाइन सेंटरमध्ये खेळाडूंच्या सर्वांची आम्ही योग्य सुविधा देण्याची काळजी घेतली आहे, ज्यामुळे सामन्यांसाठी त्यांची तयारी शक्य तितक्या चांगल्या होऊ शकेल. आम्ही आरोग्य तज्ज्ञांचे आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊ.”

दुसरीकडे, क्वारंटाइन सेंटर कुठे असेल यावर अद्याप ऑस्ट्रेलिया बोर्डांर निर्णय घेतलेला नाही. हॉकली म्हणाले, “ते साइटवरील हॉटेल असो किंवा ठिकाणे जवळपासची हॉटेल असो, ते असे वातावरण आहे जिकडे आपण संक्रमणाचा धोका कमी असेल आणि बायोसेक्योर वातावरण तयार करणे ही संपूर्ण प्राधान्य आहे. आम्ही हे करण्यास असमर्थ असल्यास मोठ्या प्रमाणावर धोका आहे.” ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा यशस्वी करण्यासाठी टेस्टिंग महत्वाची भूमिका बजावेल आणि मालिकेचा एक भाग असणाऱ्या सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोरदार प्रक्रिया करण्याची तयारी दर्शविली आहे.