क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि बीसीसीआयने (BCCI) 2020 अखेरीस भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) टीम एकमेकांच्या आमना-सामना करतील याची पुष्टी केली. विराट कोहली आणि टीम ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी जाईल ज्यानंतर ते डिसेंबरमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिकेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) बचाव करण्यासाठी ऑस्ट्रेलिया टीमविरुद्ध खेळतील ज्यामध्ये यंदा डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचाही समावेश असेल आणि अखेरीस जानेवारीमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. कोविड-19चा (COVID-19) प्रभाव अजूनही कायम असल्याने विराट सेनेला ऑस्ट्रेलिया दोन आठवड्यांच्या क्वारंटाइन (Quaratine) कालावधीतून जावे लागेल. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेची पुष्टी करताना भारतीय खेळाडूंसाठी वेगवान क्वारंटाइन कालावधी हवा आहे असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाने दुसरे प्रभावित झालेले मेलबर्न शहर वगळता देशात होणारा कोरोना व्हायरसचा प्रसार तपासला आहे. (T20 World Cup 2020: मेलबर्नमध्ये पुन्हा लॉकडाऊन, परिस्थिती पाहून तरी टी-20 वर्ल्ड कपबद्दल अंतिम निर्णय घ्या, BCCI चा ICC ला टोला)
“होय, आम्ही या दौऱ्याची पुष्टी केली आहे. डिसेंबर महिन्यात आम्ही येणार आहोत. क्वारंटाइन दिवसाची संख्या थोडी कमी होईल अशी आम्हाला आशा आहे. कारण आम्हाला असे वाटत नाही की खेळाडूंनी सर्व इतके दूर जाऊन हॉटेलच्या खोल्यांमध्ये दोन आठवडे बसून राहावे. ते अतिशय निराशाजनक आहे,” गांगुलीने टीव्ही चॅनल India Todayला सांगितले. “आणि मी म्हटल्याप्रमाणे मेलबर्न वगळता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चांगल्या स्थितीत आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही तिथे जात आहोत आणि आशा आहे की क्वारंटाइन दिवस कमी होतील.”
ऑस्ट्रेलियात 9,797 नागरिकांना करोनाची लागण झाली. यापैकी 7,728 व्यक्ती बरे झाले आहेत. दरम्यान, 8 जुलैपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघ 9 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला ज्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवण्यात आले होते. शिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या महिन्यात टी-20 वर्ल्ड कपच्या भविष्याबाबत निर्णय घेईल अशा चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारेटी-20 वर्ल्ड कप यंदा रद्द करण्याची मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियासह अनेक क्रिकेट मंडळांनी केली आहे.