IND vs AUS 2020-21: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी मार्च महिन्यानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे. आयपीएल संपुष्टात येताच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी (Sydney) येथे दाखल झालेला भारतीय संघ विश्रांती घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसत आहे कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी (India Tour of Australia) ते नेट्स आणि जिममध्ये कसून तयारी करत आहेत. कर्णधार कोहलीसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगला गेला होता आणि आगामी मालिकेत चाहत्यांकडून त्याच्याकडून मोठ्या खेळी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने ट्विटरवर कर्णधार विराट कोहलीचा नेट्समध्ये सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला ज्यात 'रन-मशीन' फटकेबाजी करताना दिसला आणि मोठे-मोठे शॉट्स खेळत ऑस्ट्रेलियन संघाला वॉर्निंग दिली. (IND vs AUS ODI 2020: टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचे 'हे' खेळाडू वनडे मालिकेत ठरू शकतात घातक, राहावे लागेल सतर्क)
उल्लेखनीय म्हणजे, व्हिडिओमध्ये विराट 'हिटमॅन' स्टाईल फलंदाजी करत अनेक शॉट्स खेळताना दिसला, जो भारतीय सेनेसाठी उत्कृष्ट गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करण्यासाठी काही भारतीय फलंदाजांनी संघर्ष केला असताना 2015 विश्वचषक विजेत्यांविरुद्ध खेळण्याचा कोहलीने आनंद लुटला आहे. 32 वर्षीय विराटने 15 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 584 धावा केल्या आहेत. त्याने शेवटच्या टी-20 सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अविस्मरणीय 72 धावांची खेळी केली. वनडेमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 38 डावांमध्ये 1,910 धावा केल्या आहेत. पाहा विराटच्या 'हिटमॅन' स्टाईल फलंदाजीचा व्हिडिओ:
Timing them to perfection! 👌👌#TeamIndia skipper @imVkohli getting batting ready ahead of the first ODI against Australia 💪🏻🔝 #AUSvIND pic.twitter.com/lG1EPoHVKK
— BCCI (@BCCI) November 26, 2020
दरम्यान, एकदिवसीय सामन्यात 12,000 धावा करणारा सहावा फलंदाज बनण्यासाठी भारतीय कर्णधार कोहलीला फक्त 133 धावांची गरज आहे. आता पर्यंत सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पॉन्टिंग, सनथ जयसूर्या आणि महेला जयवर्ध यांनी 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मोडण्याचीही भारतीय कर्णधाराला संधी आहे.