अजिंक्य रहाणे-विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचसाठी भारताने (India) आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे. अपेक्षेनुसार संघात चार बदल पाहायला मिळत आहे. पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहा यांना बाहेर केलं असून त्यांच्या जागी शुभमन गिल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाचा समावेश झालं आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतासाठी शुभमन आणि मोहम्मद सिराजला टेस्ट डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. शिवाय, नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला असल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मायदेशी परतण्यापूर्वी विराटने संघासोबत बैठक घेतली ज्यात त्याने संघाला महत्वपूर्ण संदेशही दिला. (IND vs AUS Boxing Day Test: मेलबोर्न येथे 'या' टीम इंडिया फलंदाजाने केली होता धमाल, ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज झाले होते बेहाल Watch Video)

कोहली संघ सोडून गेला असला तरी त्याने संघाला एक उत्तेजन देणारा संदेश दिल्याचे रहाणे यांनी उघड केले आणि काहीही झाले तरी सकारात्मक राहण्याचे महत्त्व त्यांना सांगितले. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला रहाणेने व्हर्च्युअली संवाद साधला आणि विराटने संघाला काय मेसेज दिला याबद्दल खुलासा केला. रहाणे म्हणाला की, "विराटने आम्हा सर्वांशी सकारात्मक असल्याचे, आपल्या सामर्थ्यानुसार खेळण्याविषयी आणि वर्षानुवर्षे आम्ही केले त्याप्रमाणे युनिट म्हणून खेळण्याबद्दल बोलले. आम्हाला एकमेकांच्या यशाचा आनंद घेण्याची, एकमेकांसाठी खेळण्याची आणि आपल्या सामर्थ्याची पाठराखण करण्याची गरज आहे." दरम्यान, 2014/15 मध्ये सामना अनिर्णित राहिला असला तरी बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याच्या भारताच्या एमसीजीमध्ये गोड आठवणी आहेत.

दरम्यान, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर पडल्याने भारताचा प्रमुख जसप्रीत बुमराहवर खूप दबाव पडताना दिसत आहे. मात्र, उमेश आणि पदार्पण करणाऱ्या सिराजवर बुमराहला आधार देण्याची मुख्य भूमिका निभवावी लागणार आहे. शिवाय, एमसीजीमध्ये सामन्यासाठी भारताने जडेजा आणि अश्विन अशा दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. बॅटिंगची स्थती आणखी मजबूत करत संघाने पंतला मधल्या फळीत सामील केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीरांची भूमिका सर्वात महत्वाची असते आणि पृथ्वी शॉ पहिल्या सामन्यात दोन्ही वेळा अपयशी ठरल्याने त्याच्या जागी शुभमनला पदार्पणाची संधी मिळाली आहे.