IND vs AUS 2020-21: 27 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) नेट्समध्ये घाम गाळत आहे, परंतु त्याचवेळी खेळाडू खूप मजाही करत आहेत. नेट प्रॅक्टिस दरम्यान भारतीय खेळाडूंनी असे काही केले जे पाहून चाहते खूप प्रभावित झाले. बुधवारी बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), पृथ्वी शॉ (Prithvi Shawa) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) एकमेकांच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसत आहेत. बुमराह आणि जडेजा यांनी एकमेकांच्या गोलंदाजी शैलीची अचूकपणे नक्कल केली, तर युवा फलंदाज पृथ्वी शॉ देखील मागे राहिला नाही. बीसीसीआयच्या व्हिडिओमध्ये जडेजाने पहिले बुमराहच्या शैलीची नक्कल केली. त्याने डाव्या हातात बुमराहसारखी गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या दौर्यावर भारतीय संघाने चांगली कामगिरी करत एकदिवसीय आणि कसोटी मालिका दोन्ही जिंकल्या होत्या. वेगवान गोलंदाज बुमराहने 2018-19 च्या मालिकेत बॉलने शानदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कंबर मोडली होती. तथापि, त्या मालिकेदरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नव्हते. या दोन फलंदाजांच्या आगमनाने हा दौरा जोरदार रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. (IND vs AUS 2020-21: मुलीला रुममध्ये खेळव! अजिंक्य रहाणेने सुट्टीच्या दिवशी बॅटिंग प्रॅक्टिस करण्याचा शोधला अनोखा मार्ग, पाहून शिखर धवनने केले ट्रोल)
यानंतर पृथ्वी शॉ महान फिरकीपटू अनिल कुंबळे आणि मुथय्या मुरलीधरन त्यांच्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. त्यानंतर बुमराह जडेजाच्या शैलीत फिरकी गोलंदाजी करायला आला. बुमराहने जडेजाच्या गोलंदाजी शैलीची अचूकपणे नक्कल केली आणि आपल्या डाव्या हाताने चेंडू अचूक टप्प्यावर फेकला. बुमराहचे हे कौशल्य पाहून चाहते देखील हैराण राहिले. पाहा व्हिडिओ:
Whose bowling actions are @Jaspritbumrah93, @imjadeja and @PrithviShaw imitating? 🤔😀 #TeamIndia pic.twitter.com/JvvPXtgbhv
— BCCI (@BCCI) November 25, 2020
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान सुरु राहिला. या दौर्यामध्ये दोन्ही संघात तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळला जाईल. दुसरीकडे, भारतीय कर्णधार विराट कोहली वनडे, टी-20 आणि पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे. 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत कसोटी मालिकेतील पहिला दिवस/रात्र कसोटी सामना खेळला जाईल. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा कसोटी संघात सामील होणार की नाही यावर संभ्रमाचं वातावरण अद्यापही कायम आहे.