IND vs AUS 2020-21: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) ऑस्ट्रेलिया दौर्याबाहेर पडला आहे असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी एक प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, आयपीएल दरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापत झाली ज्यातून भारतीय सलामी फलंदाज बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मर्यादित ओव्हर मालिकेला मुकलेल्या रोहितच्या कसोटी मालिकेत खेळण्यावर 11 डिसेंबर रोजी निर्णय घेतला जाईल. यापूर्वी रोहित आणि इशांत पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. पण आता इशांतला संपूर्ण मालिकेला मुकावे लागत आहे तर रोहितवर अद्याप निर्णय येणे शिल्लक आहे. दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला (Navdeep Saini) पाठीच्या दुखापतीची समस्या समोर अली आहे आणि टी नटराजनला (T Natarajan) त्याचा बॅक अप म्हणून एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. टी-20 संघात नटराजनची वरुण चक्रवर्तीच्या जागी निवड करण्यात आली होती, पण आता डावखुरा वेगवान गोलंदाज वनडे संघाचाही एक भाग असेल. (IND vs AUS 1st ODI: आरोन फिंचने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवाल सलामीला)
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आयपीएल 2020 मध्ये इशांत शर्माला साइड स्ट्रेन दुखापत झाली होती. तो आता पूर्ण तंदुरुस्त आहे. कसोटी सामन्यात तंदुरुस्ती साधण्यासाठी त्याने आपले काम वाढवले आहे. आता इशांत शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या बाहेर पडला आहे." बीसीसीआयनेही रोहितविषयी महत्त्वाची अपडेट दिली आहेत. त्याचे वडील कोविड-19 पॉसिटीव्ह आल्यामुळे रोहित आयपीएल फायनलनंतर आपल्या घरी परतला, असे बीसीसीआयने म्हटले आहे. रिलीजमध्ये म्हटले आहे की, "आयपीएल संपल्यानंतर रोहित शर्माला आपल्या आजारी वडिलांसोबत राहण्यासाठी मुंबईला परत जाण्याची गरज होती. त्याचे वडील आता बरे आहेत आणि म्हणूनच शर्माने एनसीएमध्ये जाऊन पुनर्वसन सुरू केले आहे."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना दिवस/रात्र कसोटी सामना असेल जो अॅडिलेड येथे खेळला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळणार असतील, शिवाय, हा सामना खेळून भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे.