IND vs AUS Test 2021: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया (India Tour of Australia) खेळाडूंना मागील दोन दिवसात काही कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागले. रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे मेलबर्नमधील (Melbourne) एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते जिथे त्यांनी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर आले. या दरम्यान, संपूर्ण संघ आज बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी सिडनीसाठी (Sydney) रवाना होणार आहे. त्यापुर्वी, टीम आणि संपूर्ण सपोर्ट-स्टाफची कोरोना व्हायरस टेस्ट करवण्यात आली ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. बीसीसीआयने (BCCI) सांगितले की, "भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचार्यांची 3 जानेवारी 2021 रोजी कोविड-19 ची आरटी-पीसीआर टेस्ट केली गेली ज्याचे सर्व निकाल नकारात्मक आले आहेत." ऑस्ट्रेलियन मीडिया पाच भारतीय खेळाडूंच्या बायो-बबल प्रोटोकॉलमधील कथित उल्लंघनाच्या चौकशीबद्दल बोलत असताना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydeny Cricket Ground) 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसर्या कसोटीवर भारतीय संघाने आपले लक्ष केंद्रित केले आहेत. (AUS Vs IND: भारतीय खेळाडूंकडून बायो सिक्युरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन; रोहित शर्मा, रिषभ पंत, नवदीप सैनी यांच्यासह 'हे' पाच खेळाडू विलगीकरण कक्षात)
ANI शी बोलताना संघातील घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, माध्यमांमधील बातमी हे खेळाडूंसाठी चिंताजनक नसतात आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने तिसर्या कसोटीच्या तयारीसाठी ते कोणतीही कसर सोडत नाही. "त्यांनी बाहेरील जग बंद केले आहे आणि कोण काय म्हणत आहे याकडेसुद्धा ते पहात नाहीत. आम्ही आमच्या विश्वासाचे समर्थन करीत आहोत की कोणताही प्रोटोकॉल खंडित झाला नाही आणि तसेच आहे. आता आम्ही तिसऱ्या कसोटी सामन्यावर विचार करीत आहोत आणि एससीजीमधील पुढील खेळाकडे लक्ष लागले आहे. कसोटी सामन्याच्या शेवटी एससीजी सोडल्यावर आम्हाला हे 2-1 करायचे आहे," सूत्रांनी म्हटले.
Biggest positive from Melbourne: Indian players test negative for coronavirus
Read @ANI Story | https://t.co/B6RfnazOUf pic.twitter.com/hD2JWUnnAB
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2021
शुक्रवारी भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी एका रेस्टॉरंटला भेट दिली होती. एका चाहत्याने रेस्टॉरंटमध्ये भारतीय खेळाडूंचे बिल भरल्याचा दावा एका ट्वीटच्या मालिकेत म्हटले ज्यामुळे खळबळ उडाली. त्याने म्हटले की रेस्टॉरंटमध्ये खेळाडूंना पाहता यावे म्हणून अतिरिक्त जेवणाची ऑर्डर दिली. पंतने त्याला मिठी मारली असल्याचेही त्याने पुढे म्हटले. संघातील घडामोडींविषयी माहिती असलेल्या सूत्रांनी शनिवारी सांगितले होते की खेळाडूंनी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळले आहेत आणि चाहत्याने स्वत: आपल्या विधानावरून यू-टर्न केल्याने कोणत्याही चौकशीची गरज नाही व सुरवातीला पंतने मिठी मारल्याचा दावा केल्यानंतर कोणताही शारीरिक संपर्क झाला नाही असेही ते म्हणाले.