IND vs AUS 2020-21: भारताविरुद्ध वनडे, टी-20 मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, Cameron Green ला पहिली संधी
कॅमेरून ग्रीन (Photo Credit: Instagram)

India Tour of Australia 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीमनंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वनडे आणि टी-20 मालिकांसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्ध अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा (Cameron Green) ऑस्ट्रेलियाच्या टी-20 आणि वनडे संघात समावेश झाला आहे तर बिग बॅश लीगमधील (Big Bash League) चमकदार कामगिरीमुळे मोइसेस हेनरिक्स (Moises Henriques) तीन वर्षानंतर राष्ट्रीय संघात परतला आहे. कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे सामने (27 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर) आणि तीन टी-20 (4, 6 आणि 8 डिसेंबर) खेळली जाईल. कॅमरूनच्या समावेशावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडक ट्रेव्हर होन्स म्हणाले की, “कॅमेरूनचा डोमेस्टिक फॉर्म अप्रतिम आहे. भविष्यातील खेळाडू म्हणून ही मालिका त्याच्यासाठी शिकण्याची संधी असेल.’’ (India vs Australia 2020-21 Full Schedule: इंडियन क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा ODI, T20I आणि Test सामन्यांच्या तारखा)

ऑस्ट्रेलियाने मर्यादित षटकांची संघ निवडताना अष्टपैलू फलंदाजींवर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, ग्रीनची निवड निश्चित असल्याचे मानले जात होते. नुकताच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेल म्हणाले की, रिकी पॉन्टिंगनंतर पहिल्यांदाच मी इतका प्रतिभावान क्रिकेटपटू पाहिला आहे. दुसरीकडे, सिडनी सिक्सर्सने हेनरिक्सच्या नेतृत्वात बिग बॅश लीगचे जेतेपद जिंकले. त्याचा स्ट्राइक रेट 150 च्या जवळपास होता. इंडियन प्रीमियर लीगदरम्यान जखमी झालेल्या मिशेल मार्शचा विचार केला जात नाही परंतु 17 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड येथे होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी तो अ संघात पुनरागमन करू शकेल. आरोन फिंच ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल तर या संघात मार्नस लॅलाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर यांचा अपेक्षेप्रमाणे समावेश करण्यात आला आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क अशा वेगवान गोलंदाजांचाही समावेश झाला आहे.

पाहा ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी-20 संघ: आरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, मोइसेस हेनरिक्सस, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श , मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि अ‍ॅडम झांपा.