IND vs AUS 1st Test Day 1: ऑस्ट्रेलियाविरुध्द (Australia) अॅडिलेड ओव्हलमध्ये (Adelaide Oval) सुरु असलेल्या पहिल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये गुरुवारी भरताने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बाद होण्याच्या काही सेकंदापूर्वी भारतीय फलंदाज कसा आऊट होऊ शकतो याचा अंदाज वर्तवला. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) गोलंदाजी आणि पृथ्वीने पहिले स्ट्राईक घेण्याची सुरुवात केल्यावर 7 क्रिकेटने साठी कमेंट्री बॉक्समध्ये आलेल्या पॉन्टिंगने भारतीय युवा सलामीवीर फलंदाजाला बॅट आणि पॅड यांच्यात अंतर सोडण्याची कशी सवय आहे ते सांगितले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय सलामीवीर बाद झाल्याच्या काही सेकंदांपूर्वी पॉन्टिंगने पृथ्वीच्या फलंदाजीतील कमजोरी उघडकीस आणली आणि मिचेल स्टार्कने त्याचा फायदा घेत भारताला पहिला धक्का दिला. (IND vs AUS 1st Test Day 1: 'ये तो होना हि था'! मिचेल स्टार्कने केली पृथ्वी शॉ याची दांडी गुल, ट्विटरवर आला भन्नाट Memes चा पाऊस)
सुनिल गावसकर यांच्यासोबत समालोचन करताना पाँटींग म्हणाला की, ‘शरीराजवळ न येणारा चेंडू पृथ्वी शॉची कमकुवत कमजोरी आहे. पॅड आणि बॅटमध्ये खूप अंतर असते, ऑस्ट्रेलियन गोलंदाज याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.’ पॉन्टिंगने म्हटल्या प्रमाणे अगदी तसेच घडले आणि स्टार्कच्या पुढील चेंडूवर पृथ्वी त्याचप्रमाणे बाद झाला. लक्षात घेण्यासारखे म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो तर पॉन्टिंग संघाचा प्रशिक्षक आहे. पाहा हा चकित करणारा व्हिडिओ:
"If he does have a chink in his armour it's the ball which does come back into him...
"Quite often leaves a big gap between bat and pad and that's where the Aussies will target." @RickyPonting at his peerless best for the Prithvi Shaw wicket #AUSvIND pic.twitter.com/4nh67zBcpU
— 7Cricket (@7Cricket) December 17, 2020
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात पृथ्वीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणेच शंकास्पद होते. 21 वर्षीय मुंबईकर फलंदाज ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन्ही सराव सामन्यात फ्लॉप झाला आणि 0, 19, 40 व 3 धावाच केल्या. परंतु संघ व्यवस्थापनाने शुबमन गिलच्या पुढे मालिकेच्या पहिल्या सामन्यात पृथ्वीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. शुभमनने सिडनी क्रिकेट मैदानावर 0, 29, 43 आणि 65 अशा धावा करत प्रभावी फलंदाजी केली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या सामन्यात जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड सलामीला येतील. अष्टपैलू कॅमरुन ग्रीन ऑस्ट्रेलियाकडून आपली पहिली कसोटी खेळेल. ऑस्ट्रेलियाने आजवर गुलाबी बॉलने सर्व सात डे-नाईट सामने जिंकले आहेत.