IND vs AUS 1st Test Day 1: 'ये तो होना हि था'! मिचेल स्टार्कने केली पृथ्वी शॉ याची दांडी गुल, ट्विटरवर आला भन्नाट Memes चा पाऊस
पृथ्वी शॉ, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 1: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सामना सुरू होण्याच्या एक दिवसआधी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हन घोषित केली होती. सलामीवीर म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) विश्वास व्यक्त केला होता. सराव सामन्यात फ्लॉप ठरलेला पृथ्वी अ‍ॅडिलेडच्या (Adelaide) पहिल्या डावातही अपयशी ठरला. अ‍ॅडिलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डे/नाईट टेस्ट (Day/Night Test) सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मयंक अग्रवालसोबत शॉने डावाची सुरुवात केली, पण ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीपुढे स्ट्राईक घेतल्यावर दोन चेंडूपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकला. दुसऱ्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) शॉ याला माघारी धाडलं. (IND vs AUS 1st Test Day 1: ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीपुढे भारत बॅकफूटवर, लंचपर्यंत भारताचा स्कोर 2/41)

मुंबईकर पृथ्वी अपयशाची मालिका यंदाही सुरूच राहिली आणि स्टार्कच्या चेंडूवर शून्यावर माघारी परतला. कर्णधाराचा पृथ्वीवरील विश्वास चुकीचा असल्याचे सिद्ध झाला आणि सोशल मीडियावर संतप्त यूजर्सने आपली  केली. पृथ्वी बाद झाल्यावर यूजर्सने मिम्सची बरसात केली.

ये तो होना हि था!

स्पष्टीकरण द्या... 

कोहलीची प्रतिक्रिया 

पहिला दिवस 

पृथ्वी शॉ

डक 

दरम्यान, लंचपर्यंत भारताने 2 गडी गमावत 41 धावा केल्या आहेत. आतापर्यंत 25 षटकांचा खेळ झाला आहे. चेतेश्वर पुजारा नाबाद 17 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 5 धावा करून क्रीजवर खेळत आहेत. तर भारताची सलामी जोडी-शॉ आणि मयंक अग्रवाल माघारी परतले.