IND vs AUS 1st Test: विराट कोहलीचा (Virat Kohli) भारतीय संघ (Indian Team) आणि टिम पेनचा (Tim Paine) यजमान ऑस्ट्रेलिया बहुचर्चित दिवस/रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत. भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिली पिंक-बॉल टेस्ट मॅच अॅडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) मैदानावर खेळली जाईल. आजपासून सुरु होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार कोहलीने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने सामन्यापूर्वीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केला होता. ऑस्ट्रेलियाकडून आजच्या सामन्यात कॅमरून ग्रीनने (Cameron Green) आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तर डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न्स सलामीला (Joe Burns) येण्यास सज्ज आहे. बर्न्ससह मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात करेल. स्टिव्ह स्मिथला यापूर्वी सरावा दरम्यान पाठीला दुखापत झाली होती, मात्र तो फिट होऊन पुन्हा खेळण्यास मैदानावर उतरणार आहे. (IND vs AUS Test 2020-21: 'त्यासाठी स्टेज सज्ज आहे,' अजिंक्य रहाणेच्या Captaincy वर विराट कोहलीचे मोठे विधान)
दुसरीकडे, भारताने यापूर्वी जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंतच्या जागी रिद्धिमान साहा आणि शुभमन गिलवर पृथ्वी शॉ याला पसंती दिली. मयंक अग्रवालसोबत पृथ्वी सलामीला येईल तर साहा विकेटकीपर-फलंदाजांची भूमिका बजावेल. शिवाय, गोलंदाजी विभागात संघाने कुलदीप यादवच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विनला प्राधान्य दिले. उमेश यादवला देखील प्लेइंग इलेव्हन स्थान मिळाले आहेत. लक्षात घेण्यासारखे म्हणजे भारतीय संघ विदेशात पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळेल. मात्र, त्यांच्यासाठी मार्ग खडतर आहे. ऑस्ट्रेलियाने आजवर सर्वाधिक सात दिवस/रात्र कसोटी सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
पाहा ऑस्ट्रेलिया-भारताचा अॅडिलेड कसोटीचा प्लेइंग इलेव्हन
भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, आणि नॅथन लायन.