IND vs AUS Test 2020-21: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) लढत 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. अॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार असून भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानंतर मायदेशी रवाना होणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व करेल. यापूर्वी रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोन कसोटी सामने जिंकले आहेत, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही संघ (India Tour of Australia) रहाणेच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करेल असा विश्वास कोहलीने दर्शवला आहे. कोहलीने बुधवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की, "अजिंक्य रहाणे त्यांच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करेल आणि त्यासाठी स्टेज सज्ज आहे, तसेच याबद्दल सर्वांना ठाऊक आहे." यापूर्वी डाऊन अंडर ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध दोन सराव सामन्यांमध्ये मुंबईकर फलंदाजाने संघाचे नेतृत्व केले होते. (IND vs AUS 1st Test Playing XI: अॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक-बॉल कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन जाहीर, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान)
बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये विराट कोहली म्हणाला की गेल्या काही वर्षांत आमच्या दोघांमध्ये परस्पर समंजसपणा आणि आदर आहे. कोहली म्हणाला की, "बरीच वर्षे आमच्यात परस्परांबद्दल समजूतदारपणा आणि आदर आहे. आम्ही चांगली भागीदारी केली आहे, एकत्र फलंदाजी केली आहे. रहाणेने दोन सराव सामन्यांत शानदार कामगिरी केली आहे. यापूर्वी झालेल्या दोन सराव सामन्यात रहाणेने जबरदस्त कामगिरी केली आहे. तो खूपच रचनाकार आहे आणि तो आमच्या संघाची शक्ती आणि आम्हाला कसे खेळायचे व गोष्टी कशा घ्यायच्या हे माहित आहे." विराटच्या अनुपस्थितीत रहाणेने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला आणि बेंगलोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टेस्ट सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहेत.
'Ajinkya and I are on the same page and I’m sure he'll do a tremendous job in my absence,' says #TeamIndia Skipper @imVkohli on the eve of the first Test against Australia.#AUSvIND pic.twitter.com/S8fmUABfUC
— BCCI (@BCCI) December 16, 2020
कोहली म्हणाला की, तो आणि रहाणे दोघेही एकाच पानावर आहेत आणि त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील फलंदाज संघाला नेतृत्व देण्यास भरीव कामगिरी करेल याचा आत्मविश्वास व्यक्त केला. कोहली म्हणाला की, "मी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मी सर्वोत्तम कर्णधार होण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम फलंदाजी कारेन. त्यानंतर रहाणे उत्तम कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. मी आधी असे म्हटले आहे की कर्णधार आणि व्यक्ती म्हणून पुढे येऊन आणि जोरदार कामगिरी करण्याची ही वेळ आहे."