IND vs AUS 1st T20I Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील टी-20 मालिकेचा पहिला सामना कॅनबेरामध्ये (Canberra) खेळला जाईल. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-2 ने पराभवाला सामोरे जाणारी टीम इंडिया (Team India) नवी सुरुवात करू पाहत असेल आणि मालिकेची विजयी सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असेल. एकदिवसीय मालिकेप्रमाणेच यजमान ऑस्ट्रेलियन संघ (Australian Team) टी-20 मालिकेत देखील प्रभावी कामगिरी करण्याच्या निर्धारित असेल. कॅनबेराच्या मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:40 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 1:10 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (IND vs AUS 1st T20I: टी -20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया टीमवर भारी टीम इंडिया, पाहा हे आकडे)
वनडे मालिकेने दौर्याची सुरूवात भारतासाठी फारशी चांगली नव्हती. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात झालेल्या जोरदार पराभवानंतर भारताने तिसर्या वनडे सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामना 13 धावांनी जिंकला. तिसर्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या विजयामुळे भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास वाढला असेल आणि आता संघ नव्या जोमाने टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरेल. टी-20 मध्ये भारताचा संतुलित संघ आहे आणि शुक्रवारी सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियासमोर कडवे आव्हान असेल. कोरोना व्हायरसपूर्वी झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाने टी-20 मालिकेत क्लीन स्वीप केला होता, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या निकालामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप उंचावला असेल.
पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारताचा टी-20 संघ
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट आणि अॅडम झँपा.
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन.