IND vs AUS 1st T20I: पहिल्या टी-20 साठी असा असेल भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन, कॅनबेरा येथे 'हे' 11 खेळाडू उतरणार मैदानात
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3rd वनडे (Photo Credit: PTI)

IND vs AUA 1st T20I Probable Playing XI: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला (Indian Team) यजमान ऑस्ट्रेलियाने (Australia) 2-1 असे पराभूत केले. यानंतर आता भारतीय संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे, ज्याचा पहिला सामना शुक्रवारी 4 डिसेंबर रोजी कॅनबेराच्या (Canberra) मानुका ओव्हलवर (Manuka Oval) खेळला जाईल. पहिल्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो? याबाबत जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून आहे. टी -20 क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून केएल राहुलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-20 मालिकेत भारतीय संघासाठी सलामीला शिखर धवनसोबत राहुल मैदानावर उतरू शकतो. स्वत: कर्णधार कोहली तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करेल. (IND vs AUS T20I 2020-21: टीम इंडियासाठी 'हे' खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज, ठरू शकतात गेमचेंजर)

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या स्थानावर मनीष पांडेला संधी मिळू शकते. शिवाय, हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर तर सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असल्याचे मानले जात आहे. गोलंदाजी विभागात भारतीय संघ जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरसह फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल मैदानात उतरू शकतो. तथापि, कर्णधार कोहली शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांनाही गोलंदाजी विभागात प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न नक्की करेल. दुसरीकडे, डेविड वॉर्नर नसल्याने ऑस्ट्रेलियासमोर टॉप-ऑर्डरची समस्या असेल. अशा स्थितीत मार्कस स्टोइनिस कर्णधार आरोन फिंचसह सलामीची जबाबदारी घ्यावी लागेल किंवा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही डावाची सुरुवात करू शकतो. याशिवाय मिडल ऑर्डर आणि विकेटकीपरची निवड करणेदेखील कर्णधार फिंचसाठी समस्या आहे, कारण मॅथ्यू वेड आणि अ‍ॅलेक्स कॅरी दोघेही फॉर्ममध्ये आहेत.

पाहा पहिल्या टी-20 साठी भारत-ऑस्ट्रेलियाचा संभावित प्लेइंग XI

भारत: शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहर.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), मार्कस स्टॉयनिस, स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, डॉर्सी शॉर्ट, मोईसेस हेनरिक्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड आणि अ‍ॅडम झांपा.