आरोन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: PTI, Twitter/ICC)

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघात (Indian Team) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात यजमान संघाने पहिले फलंदाजी करत कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch), स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या शतकांच्या बळावर 374 धावांचा डोंगर उभारला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. पहिले फलंदाजी करताना कांगारू संघाकडून फिंचने सर्वाधिक 114, स्मिथ 105 आणि डेविड वॉर्नरने  69 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 45 धावांचे योगदान दिले. स्मिथने 62 चेंडूत शतक पूर्ण केले. दुसरीकडे, भारतीय संघाला खराब फिल्डिंगचा फटका बसला. टीम इंडिया खेळाडूंकडे गलथान श्रेत्ररक्षण पाहायला मिळाले, ज्यामुळे यजमान संघाने मोठी धावसंख्या गाठली. संघासाठी मोहम्मद शमीला (Mohammed Shami) सर्वाधिक 3 तर, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2020-21: 'रोहित शर्माच्या दुखापतीबाबत स्पष्टतेचा अभाव आणि अनिश्चितता जास्त', हिटमॅनच्या फिटनेसवर विराट कोहलीने सोडले मौन)

कोरोना व्हायरस काळात प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजचा सामना खेळायला आला. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार फिंच आणि वॉर्नरच्या सलामी जोडीने सावध सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी सुधारित फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. या दरम्यान फिंचने वनडेमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत दोघांनी अर्धशतकझळकावलं. दोन्ही फलंदाजांची भागीदारी डोकेदुखी ठरत असताना शमीने च्या गोलंदाजीवर वॉर्नर 76 चेंडूत वॉर्नरची 6 चौकारांसह 69 धावांची खेळी करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्मिथने फिंचला उत्तम साथ देत अर्धशतक झळकावलं. फिंच-स्मिथच्या महत्वपूर्ण भागीदारीने टीमला दोनशे पार नेले. फिंचने धडाकेबाज शतक साजरी केलं, पण बुमराहच्या गोलंदाजीवर खेळताना 124 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह फिंच 114 धावांवर यष्टीरक्षक लोकेश राहुलकडे झेल होऊन माघारी परतला. मार्कस स्टोइनिसला पहिल्याच चेंडूवर चहलने माघारी धाडलं.

दुसरीकडे, आयपीएलमध्ये एकही षटकार न मारू शकलेल्या मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. मॅक्सवेलने 19 चेंडूत 45 धावा केल्या. आपल्या खेळीत मॅक्सवेलने 5 चौकर आणि 3 षटकार लागले. आजच्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी निराशाजनक कामगिरी समोर आली. त्यांनी अनेक झेल सोडले ज्याच्या फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.