रिषभ पंत (Photo Credit: Getty Images)

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) याला फलंदाजी दरम्यान दुखापत झाल्यामुळे तो फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. पंतला फलंदाजी करताना डोक्याला फटका बसला, त्यानंतर यष्टीरक्षणासाठी तो मैदानावर आला नाही. केएल राहुल (KL Rahul) याने त्याच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली आहे, तर मनीष पांडे (Manish Pandey)कन्क्शन म्हणून मैदानात आला आहे. पंतच्या प्रकृतीवर बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे की, हेल्मेटवर बॉल लागल्यामुळे सवलतीची चाचणी घेण्यात आली आहे. पंतला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून फिल्डिंगसाठी पंतची जागा मनीषने घेतली आहे. पंतने या सामन्यात 32 चेंडूंत 28 धावा केल्या. (Video: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये अ‍ॅडम झांपा याने आपल्याच चेंडूवर पकडला विराट कोहली याचा अफलातून कॅच)

भारतीय डावाच्या 44 व्या षटकात ही घटना घडली. पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या दुसर्‍या बॉलवर पंतने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागून हेल्मेटला लागला आणि त्यानंतर अ‍ॅस्टन टर्नर याने त्याचा झेल पकडला. अशा प्रकारे 32 चेंडूत 28 धावा करून पंत बाद झाला. पॅव्हिलिअनमध्ये परत जात असताना पंतला आराम वाटत नव्हता आणि त्याला चक्कर येत होती. यानंतर त्याची कन्क्शन टेस्ट घेण्यात आली, त्यानंतर त्याला मैदानात उतरवता आले नाही.

आजच्या सामन्याबद्दल बोलले तर, वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंत व्यतिरिक्त आज सलामीवीर शिखर धवनने संघासाठी सर्वाधिक 74 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. धवनने या अर्धशतकाच्या खेळीदरम्यान 91 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार आणि एक षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात गोलंदाजीने प्रभावी कामगिरी करत भारताला ऑलआऊट केले. भारतासाठी धवन आणि राहुलच्या व्यतिरिक्त, रोहित शर्मा याने 15 चेंडूत दोन चौकार मारत 10, राहुलने 61 चेंडूत चार चौकारासह 47, कर्णधार विराट कोहली याने 14 चेंडूत एक षटकार मारत 16, श्रेयस अय्यर याने नऊ चेंडू चार, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने 32 चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार मारत 25, शार्दूल ठाकुर याने 10 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 13, मोहम्मद शमी याने 15 चेंडूत दो चौकाराच्या मदतीनं 10, कुलदीप यादव याने 17 आणि जसप्रीत बुमराह शून्यावर नाबाद परतला.