आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये सेमीफायनल साठी चुरस वाढत चाल्ली आहे. कोणते चार संघ सेमीफायनल ला पोहचणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आज भारताचा (India) सामना अफगाणिस्तान (Afghanistan) संघांशी होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही, तर भारत अजून अपराजित राहिला आहे. आज सामना भारतीय संघासाठी खास सुद्धा आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाकडे एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. (India vs Afghanistan Live Streaming on DD Sports and Prasar Bharti for Free: रेडिओ वर लूटा IND vs AFG एजबस्टन सामन्याचा LIVE आनंद)
आजचा सामना जिंकल्यास हा भारताचा विश्वकपमधला 50वा विजय ठरेल. विश्वकपमध्ये आजवर भारताने 78 सामने खेळले आहेत, त्यातील 49 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. विश्वकपच्या इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने 50हून अधिक सामन्यात विजय मिळवता आला आहे. ऑस्ट्रेलियानं 67 सामन्यात तर, न्यूझीलंडनं 52 सामन्यात विजय मिळवला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात साऊदम्पटन मैदानावर सामना होत आहे. अफगाणिस्तान ने आतापर्यंत विश्वकपमध्ये एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. शिवाय अफगाणिस्तान विरुद्ध सामना जिंकत भारतीय संघ थेट गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल.