IND v AUS 2020 Test: भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाने (Australia) मर्यादित ओव्हरच्या मालिकेनंतर आता कसोटी मालिकेच्या तयारीला सुरुवात केली आहे. या कसोटी मालिकेची सुरूवात अॅडिलेडमधील डे-नाईट कसोटी (Adelaide Day/Night Test) सामन्याने 17 डिसेंबरपासून होईल ज्यानंतर पुढची टेस्ट, म्हणजेच बॉक्सिंग डे टेस्ट मेलबर्न येथे खेळला जाईल. आणि यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Groudn) प्रत्येक दिवशी येणाऱ्या प्रेक्षक संख्येत वाढ केली आहे. मेलबर्नमध्ये होणारा बॉक्सिंग डे सामना (Boxing Day Test) तब्बल 30,000 प्रेक्षकांना दररोज पाहण्याची संधी मिळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी याची घोषणा केली. ते म्हणाले की, बॉक्सिंग डे टेस्टसाठी MCG मध्ये दर्शकांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्ही हे आव्हान स्वीकारतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान हा सामना खेळला जाईल, तर सामन्यासाठी तिकिटांची विक्रीही सुरु झाली आहे. (IND vs AUS 2020-21: टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव, पण 'या' भारतीय गोलंदाजावर डेविड वॉर्नर खुश, लिहिली खास Post)
यापूर्वी कोरोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दररोज केवळ 25 हजार प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली होती जी त्यांनी आता 5 हजार दर्शकांनी वाढवली आहे. दुसरीकडे, 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टेडियमच्या 50% म्हणजेच 27,000 हजार प्रेक्षकांना दररोज सामना पाहण्याची परवानगी दिली जाईल. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. टीम इंडियाचा हा दुसरा तर ऑस्ट्रेलियाचा आठवा दिवस/रात्र सामना असेल. शिवाय, दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळतील. याशिवाय, सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यासाठीही केवळ 50% म्हणजेच 23,000 प्रेक्षकांना दररोज सामना पाहण्याची परवानगी मिळेल. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून खेळला जाईल. 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात दररोज 75% म्हणजेच 30 हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर खेळला जाईल.
We’re so excited to be able to welcome so many fans to the MCG in what’s been such a challenging year for Victorians! 🏟 #AUSvIND
All public tickets are available from 3pm AEDT tomorrow afternoon: https://t.co/yhYqPqaGFD pic.twitter.com/WApbNHWyH4
— Cricket Australia (@CricketAus) December 10, 2020
यापूर्वी, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळली गेली. ऑस्ट्रेलियाने वनडेमध्ये 2-1 तर टीम इंडियाने टी-20 मालिकेत 1-2 ने विजय मिळवला होता. भारत-ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जाईल, तर पहिला सामना जिंकून विराटसेना गुणतालिकेत कांगारूंना पछाडून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवू इच्छित असतील.