डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वॉर्नरने (David Warner) एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतील शानदार कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा सहकारी टी नटराजनचे (T Natarajan) कौतुक केले. सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) तिसर्‍या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला असला तरी भारताने 2-1 ने मालिका जिंकली आणि यासह मर्यादित ओव्हर मालिका टी-20 मालिकेने संपुष्टात आली. कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या या अनुभवी खेळाडूंनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली तर डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजननेही चेंडूने जोरदार प्रभावदार कामगिरी केली. उर्वरित भारतीय तुकडीसह नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले होते, मात्र त्याला वरुण चक्रवर्तीच्या जागी टी-20 संघात सामील करण्यात आले. टी-20 सामन्यात त्याने आपली प्रभावी खेळी सुरू ठेवली आणि मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. (AUS vs IND Test 2020: अ‍ॅडिलेड मॅचपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, डेविड वॉर्नर पहिल्या कसोटी सामन्यातून आऊट; 'या' खेळाडूला संधीची शक्यता)

वॉर्नर म्हणाला की टी -20 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतरही नटराजनसाठी मी आनंदी आहे. आयपीएलमध्ये SRH चे नेतृत्व करणार्‍या ऑस्ट्रेलियन सलामीवीरने आपल्या आयपीएलच्या सहकाऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आणि त्याचे तोंडभरून कौतुक केले. "विजय, हरणे किंवा ड्रॉ असो आम्ही मैदानात किंवा बाहेर एकमेकांचा आदर करतो. मालिका गमावल्यानंतरही, टी नटराजनसाठी मी आनंदी आहे आणि त्याचे खेळावर खूप प्रेम आहे. नेट गोलंदाज म्हणून या दौर्‍यावर जाण्यापासून भारतासाठी एकदिवसीय/टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापर्यंत मित्राने काय कामगिरी केली," वॉर्नरने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले.

नटराजनने पदार्पणाच्या दौऱ्यावर उत्तम कौशल्यांनी कायमची छाप सोडली. जबरदस्त यॉर्कर गोलंदाजीसाठी परिचित असलेल्या नटराजनने टी-20 मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत जबाबदारी घेतली आणि  गोलंदाजांची धुलाई होत असताना चांगल्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2 वनडे आणि 6 टी-20) खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये एकूण 8 गडी बाद केले. नटराजनने तिसऱ्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत 2 विकेट घेतल्या. नटराजन नम्र आणि मेहनती आहे, असे सांगत आगामीभारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील वेगवान गोलंदाजाचे कौतुक केले. कर्णधार म्हणाला की, डावखुरा वेगवान गोलंदाज पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो.