हनुमा विहारी आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter/BCCI)

IND-A vs AUS-A Tour Match: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघाविरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघावर हल्लाबोल केला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 108 धावांवर ऑलआऊट करत दुसऱ्या दिवशी भारताने (India) 86 धावांच्या आघाडीसह खेळण्यास सुरुवात केली आणि दिवसाखेर 472 धावांची आघाडी मिळवली. भारताकडून मयंक अग्रवाल, शुभमन गिल, हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी दमदार कामगिरी केली. अग्रवाल आणि गिलने अनुक्रमे 61 आणि 65 धावा केल्या, तर विहारी आणि पंतने एक पाऊल पुढे टाकत तुफानी शतक ठोकले. विहारी नाबाद 104 तर पंत नाबाद 103 धावा करून परतला. पंतच्या कामगिरीने  मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले. पंतने तुफान फलंदाजी करत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद शतकी डाव खेळला. (IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारतीय फलंदाजांचा चौफेर हल्ला; हनुमा विहारी, रिषभ पंत यांच्या शतकी खेळीने दुसऱ्या दिवसाखेर भारताची 472 धावांची आघाडी)

दिवसाच्या अंतिम ओव्हरमध्ये पंतने गियर बदलला आणि चौकार-षटकारांची बरसात करत खेळ संपण्यापूर्वी शतक पूर्ण केले. पंत अंतिम ओव्हरच्या सुरुवातीला 81 धावा करून खेळत होता. पण, अंतिम ओव्हरमध्ये त्याने फटकेबाजी करत ओव्हरमध्ये चार चौकार आणि एक षटकार मारत एकूण 22 धावा लुटल्या आणि अवघ्या 73 चेंडूत शंभरी गाठली. पंतच्या या खेळीवर यूजर्सने देखील तोंडभरून कौतुक केलं.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

प्रतिकार

पंतचे कमबॅक

प्रतिभाशाली आहे...

विशेष खेळाडू

आणखी एक

टीकाकारांची स्थिती

दरम्यान, सिडनीमधील सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला. पण, तोडायचं वेळात खेळ पुन्हा सुरु झाला आणि दोन्ही फलंदाजांनी आपली विकेट सांभाळत दिवसाखेर संघाला 4 विकेट गमावून 386 धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबल्यावर भारताने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 472 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 194 धावांवर ऑलआऊट झाल्यावर गोलंदाजांनी संघाला जोरदार पुनरागमन करून दिलं आणि संघाला 108 धावांवर रोखलं. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी अशा भारतीय वेगवान गोलंदाजी हल्ल्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेर झाले.