Afghanistan Beat Australia: अफगाण संघाच्या यशात 'या' दोन दिग्गजांचा होता हात! अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचे ठरले मोठे साक्षीदार
Jonathan Trott And Dwayne Bravo (Photo Credit - X)

Afghanistan Cricket Team: अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) ऑस्ट्रेलियाचा पराभव (AFG Beat AUS) करून मोठा अपसेट निर्माण केला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय सातत्याने चर्चेत आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. पण अफगाणिस्तानच्या विजयात सपोर्ट स्टाफचा महत्त्वाचा वाटा आहे हे तुम्हाला माहीत आहे का. खरं तर, अफगाणिस्तानच्या सपोर्ट स्टाफमध्ये त्यांच्या काळातील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. (हे देखील वाचा: AFG T20 WC 2024 Semi-final Qualification Scenarios: ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा जिवंत; काय आहे समीकरण घ्या जाणून)

अफगाण संघाच्या यशात या दोन दिग्गजांचा होता हात!

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा प्रमुख कोच इंग्लंडचा माजी दिग्गज जोनाथन ट्रॉट आहे. वास्तविक, जोनाथन ट्रॉट बराच काळ अफगाणिस्तान संघाशी संबंधित आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू डीजे ब्राव्हो गोलंदाजी सल्लागार म्हणून आहे. या अनुभवी सपोर्ट स्टाफच्या रणनीतीमुळे राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचे काम सोपे झाले. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारताचा माजी दिग्गज अजय जडेजाने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आपली सेवा दिली होती.

सामन्याचा लेखाजोखा

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने 49 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय इब्राहिम झद्रानने 48 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 118 धावांची भागीदारी केली. अफगाणिस्तानच्या 148 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकात 127 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूत 59 धावांची चांगली खेळी खेळली, पण त्याला विजय मिळवता आला नाही.