IND vs ZIM 4th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज हरारे येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका काबीज करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल. या सामन्यात झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यात टीम इंडियाच्या खेळात काय बदल होऊ शकतात. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल करू शकते. संघ व्यवस्थापन या सामन्यात शिवम दुबेच्या जागी रियान परागला संधी देऊ शकते. दुबे गेल्या काही काळापासून वाईट काळाशी झुंजत आहे तर पराग सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गरज पडल्यास तो गोलंदाजीही करू शकतो. याशिवाय मुकेश कुमार पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करू शकतात. गेल्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती.
तुषार देशपांडे करू शकतो पदार्पण
या सामन्यातून तुषार देशपांडे टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो. टीम इंडिया या सामन्यात आवेश खान आणि खलील अहमदला विश्रांती देऊ शकते. तुषार देशपांडेने आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी केली होती. या मालिकेत जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. (हे देखील वाचा: Team India New Record T20I: झिम्बाब्वेला पराभूत करून टीम इंडियाने रचला एक अनोखा विक्रम, आजपर्यंत कोणीही करू शकले नाही हे काम)
चौथ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार.