![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/11/nz-vs-sl-4-.jpg?width=380&height=214)
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team ODI Stats: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 13 नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांमध्ये आधी दोन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. श्रीलंकेने नुकतेच घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिज आणि भारताचा पराभव केला. अशा स्थितीत न्यूझीलंडलाही कडवे आव्हान दिले जाऊ शकते. (हे देखील वाचा: SL vs NZ 1st ODI Live Streaming: टी-20 नंतर बुधवारपासून न्यूझीलंड आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेत भिडणार, भारतात कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून)
दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळणार रोमांचक सामना
एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असालंकाच्या खांद्यावर असेल. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज कुसल परेरा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराज यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तर न्यूझीलंडचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे असेल. यष्टिरक्षक फलंदाज मिच हे आणि अष्टपैलू नॅथन स्मिथ यांचा प्रथमच किवी संघात समावेश करण्यात आला आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकाॅर्ड
श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या संघांनी आतापर्यंत एकूण 102 वेळा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. न्यूझीलंडने 102 पैकी 52 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 41 सामने जिंकले आहेत. नोव्हेंबरमध्ये बंगळुरू येथे आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साखळी सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटची टक्कर झाली होती. जिथे किवी संघाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता न्यूझीलंड संघ अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जात असली तरी. त्यामुळे श्रीलंकेला हरवणे किवी संघासाठी तितके सोपे नसेल.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत. कुमार संगकाराने न्यूझीलंडविरुद्धच्या 47 सामन्यांच्या 45 डावांमध्ये 40.20 च्या सरासरीने 1568 धावा केल्या आहेत. या कालावधीत, कुमार संगकाराने 12 अर्धशतके आणि 2 शतके केली आहेत आणि 113* धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
कुमार संगकारा (श्रीलंका) - 1568
सनथ जयसूर्या (श्रीलंका) - 1519
महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1326
तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) - 1308
मारवान सॅमसन अटापट्टू (श्रीलंका) - 908
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरनने न्यूझीलंडविरुद्धच्या 41 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 17.94 च्या सरासरीने आणि 3.55 च्या इकॉनॉमीने 74 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय या यादीत श्रीलंकेची चामिंडा वास दुसऱ्या स्थानावर आहे. चामिंडा वासने न्यूझीलंडविरुद्धच्या 35 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 22.22 च्या सरासरीने आणि 3.84 च्या इकॉनॉमीने 49 विकेट घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचा काईल डेव्हिड मिल्स ३२ विकेट्ससह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)- 74
चामिंडा वास (श्रीलंका)- 49
सनथ जयसूर्या (श्रीलंका)- 38
लसिथ मलिंगा (श्रीलंका)- 36
काइल डेव्हिड मिल्स (न्यूझीलंड) - 32