Hardik Pandya's Replacement: हार्दिक पांड्याला झटका; धोनीच्या टीमचा हा स्टार बनणार टीम इंडियाचा पुढील अष्टपैलू, प्रशिक्षकाने केले समर्थन
शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

Hardik Pandya's Replacement: भारतीय संघ (Indian Team) येत्या आठवड्यात इंग्लंड येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल तसेच इंग्लंडविरुद्ध (England) 5 कसोटी सामन्यांच्या मोठ्या दौऱ्यासाठी युनायडेट किंगडमला रवाना होणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अद्याप गोलंदाजी करत नसल्याने निवड समितीकडे त्याला संघातून वगळता पर्याय नव्हता आणि आता शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) गोलंदाजी-अष्टपैलूची भूमिका बजावण्यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे. रवींद्र जडेजाचा आणि क्रुणाल पांड्याच्या उदयामुळे मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मदत झाली असली तरी कसोटी क्रिकेटमधील आव्हान अद्यापही आव्हान राहिले आहे. इंग्लंडसारख्या सीम अनुकूल खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या संधी कमी होऊ शकतात. हार्दिक संघातून अनुपस्थित असताना गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणने (Bharat Arun) ठाकूरला जागा भरण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. (उत्तम कामगिरीनंतरही Prithvi Shaw ला भारतीय संघात का जागा मिळाली नाही? बीसीसीआयने सांगितले कारण)

अरुण यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की पुढील पर्यायांचा शोध घेण्याबाबत निवडकर्त्यांचा निर्णय असेल तर ठाकूरने योग्य पर्याय म्हणून उपलब्द केले आहे. “त्यांना शोधणे निवडकर्त्यांचे काम आहे आणि त्यानंतर आम्ही त्या अष्टपैलू खेळाडूंचा विकास करू शकतो. शार्दुलने सिद्ध केले की तो अष्टपैलू बनू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये त्याने जे केले ते आश्चर्यकारक होते,” आयर्नवूड एज्युकेशन कंपनीच्या संवादात अरुणने सांगितले. 2018 इंग्लंड दौऱ्यावर अखेर हार्दिक भारताकडून कसोटी क्रिकेट खेळला होता. त्यानंतर 2019 मध्ये पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यामुळे त्याने अद्याप गोलंदाजी केलेली नाही. पांड्यासारखा एखादा चांगला अष्टपैलू शोधणे खूप कठीण काम असेल असे अरुण यांनी मान्य केले. दरम्यान, अष्टपैलू गोलंदाज म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचेही ठाकूरने यापूर्वी बोलून दाखवले असून आगामी इंग्लंड दौर्‍यादरम्यान त्याला बरीच संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे, इंग्लंडमध्ये भारत सहा कसोटी सामने खेळत असून न्यूझीलंड विरुद्ध 18 जूनपासून होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापासून सुरुवात होईल. संघात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, ठाकूर आणि मोहम्मद सिराज असे सहा वेगवान गोलंदाज आहेत.