भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) याने एका इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला बाद करण्यासाठी संघ मलिकने आपल्याला दिलेल्या विशेष भेट दिल्याच्या प्रसंगाचा खुलासा केला. 2009 दक्षिण आफ्रिकेत आयोजित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि डेक्कन चरजर्समधील (Deccan Chargers) सामन्यापूर्वी ओझा आणि संघ मालकात संवाद झाला ज्यात त्याने सचिनला बाद केल्यावर भेटवस्तू देण्याची हमी दिली. विस्डन इंडियाला प्रज्ञानने नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अनेक रंजक किस्से सांगितले. ज्यामध्ये आयपीएल सामन्यात सचिनला बाद करण्यासाठी त्याला संघमालकाकडून गिफ्ट मिळाले होते तो प्रसंग सांगितला. (सचिन तेंडुलकर की राहुल द्रविड? ऑनलाईन पोलमध्ये 'द वॉल' ठरला 50 वर्षातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, Netizens मध्ये विवादाला सुरुवात)
ओझा म्हणाला, “आयपीएल 2009 आफ्रिकेत होतं. आमचा मालक माझ्याकडे आला, आणि ज्याप्रकारे मी दक्षिण आफ्रिकेमध्ये गोलंदाजी करीत होतो, त्याबद्दल माझ्याशी संवाद साधला. तो हैदराबादचा आहे [ओझाने रणजी ट्रॉफीमध्ये प्रतिनिधित्व केलेला संघ], हैदराबाद क्रिकेट असोसिएशन सिस्टममधील आमच्या स्थानिक लीगमधील तो संघ मालकांपैकी एक आहे. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, प्रज्ञान, तुम्हाला सचिन तेंडुलकरची विकेट मिळाली तर नक्कीच माझ्याकडून तुमच्यासाठी एक खास भेट देईन. मला घड्याळे आवडतात हे त्यांना माहित होते. मी त्याला म्हणालो, ‘सर, जर मला त्याची विकेट मिळाली तर मला घड्याळ हवे आहे. दुसऱ्या दिवशी सचिन पाजीची विकेट मला मिळाली आणि त्यांनी मला घड्याळाची भेट दिली.”
सचिनची विकेट चारजर्ससाठी महत्वाची ठरली. 169 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईने 86 धावांवर 1 विकेट गमावली होती. पण ओझाने नंतर तीन महत्वपूर्ण विकेट घेत मुंबईला 156 धावांवर रोखले. ओझाने तेंडुलकरला 36 धावांवर हर्शल गिब्सकडे कॅच आऊट केले. त्या विकेटची आठवण काढत ओझा म्हणाला, “ही एक खास विकेट आहे. सचिन पाजी सारख्याची विकेट मिळवणे ही एक विलक्षण भावना आहे, ही एक विकेट आहे ज्याचे आपण नेहमीच एक गोलंदाज म्हणून स्वप्न पाहतात. आपणास छान वाटते, की जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांशी स्पर्धा करण्यासाठी तुम्ही योग्य आहात.”