
भारताच्या संघाने ऑस्ट्रेलिया (Australia) विरोधातील कसोटी मालिकेसोबत वन-डे मालिका जिंकल्याने ऐतिहातिक कामगिरी केली आहे. यामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान भारतीय संघावर टीका करण्यात आल्या. तर भारताने विजय मिळवलेल्या कामगिरीवर वक्तव्य करताना रवी शास्री (Ravi Shastri) यांनी टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर दिले आहे.
'द डेली टेलिग्राफक' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून रवी शास्री यांनी भारतीय संघाविरुद्ध टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. रवी शास्री म्हणाले की, टीका होणे हा भाग समजू शकतो. परंतु जाणूबुजून टीका केल्यास मी शांत राहणार नाही असा संताप त्यांनी मुलाखती दरम्यान व्यक्त केला आहे. तसेच टीका करणारा व्यक्ती जरी दिग्गज खेळाडू अथवा कोणीही असले त्याचा मी विचार करणार नाही. (हेही वाचा-India Vs Australia 3rd ODI: ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव, पहा वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचे ट्विट!)
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला.त्यानंतर सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाच्या सरावाबद्दल टीका केली. मात्र रवी शास्री यांनी टीका केल्यामुळे भारतीय संघ मेलबर्न येथील सामन्यात उत्तम खेळू शकला असे त्यांनी म्हटले आहे.