ICC WTC Final 2021: ब्लॉकबस्टर फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने; विराट, रोहित, बुमराह समवेत टीम इंडिया करणार विक्रमांची भरमार

विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ आणि किवी संघातील अनेक खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरेल. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा तसेच रॉस टेलर, बीजे वॅटलिंग सोबत अनेक खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची मोठी संधी आहे.

क्रिकेट Priyanka Vartak|

केन विलियमसन, आर अश्विन (Photo Credit: IANS)

ICC WTC Final 2021: विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड (New Zealand) संघ 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात आमनेसामने येणार आहेत. सामन्याला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना किवी संघ इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत तर टीम इंडियाने आपला आयसोलेश कालावधी पूर्ण करून पहिल्या प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारतीय संघ आणि किवी संघातील अनेक खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरेल. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) तसेच किवी संघाच्या रॉस टेलर (Ross Taylor), बीजे वॅटलिंग (BJ Watling) सोबत अनेक खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची मोठी संधी आहे. (ICC WTC Final 2021: टीम इंडियाने कसली कंबर, न्यूझीलंड विरोधात फायनल लढतीसाठी सुरु केली तयारी Watch Video)

1. कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटी सामना खेळणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा माजी वेगवान बॉलर झहीर खानच्या मोठ्या विक्रमाच्या मागावर आहे. झहीरने 311 कसोटी विकेट्स घेतल्या असून इशांत त्याच्या 9 विकेट्स मागे आहे.

2. न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरला कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 188 धावांची आवश्यकता आहे. त्याने भारताविरुद्ध 14 कसोटी सामन्यात 812 धावा काढल्या आहेत. याशिवाय, सचिन तेंडुलकरच्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यातील 4 शतकांची बरोबरी करण्यापासून तो एक शतक दूर आहे.

3. न्यूझीलंड संघ वॅटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्टाईलने विदाई देण्यासाठी उत्सुक असतील. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात सर्वाधिक डिसमिसल्सच्या एमएस धोनीचा रेकॉर्ड मोडण्यापासून त्याला फक्त एक विकेटची गरज आहे.

4. भारताचा अष्टपigarettes-528219.html" title="Virar Video: अरे देवा! सिगारेट देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंपवर थेट कार पेटवली, तरुणाची पराक्रम कॅमेरात कैद">Virar Video: अरे देवा! सिगारेट देण्यास नकार दिल्याने पेट्रोलपंपवर थेट कार पेटवली, तरुणाची पराक्रम कॅमेरात कैद

Close
Search

ICC WTC Final 2021: ब्लॉकबस्टर फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने; विराट, रोहित, बुमराह समवेत टीम इंडिया करणार विक्रमांची भरमार

विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघ आणि किवी संघातील अनेक खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरेल. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा तसेच रॉस टेलर, बीजे वॅटलिंग सोबत अनेक खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची मोठी संधी आहे.

क्रिकेट Priyanka Vartak|
ICC WTC Final 2021: ब्लॉकबस्टर फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने; विराट, रोहित, बुमराह समवेत टीम इंडिया करणार विक्रमांची भरमार
केन विलियमसन, आर अश्विन (Photo Credit: IANS)

ICC WTC Final 2021: विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड (New Zealand) संघ 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात आमनेसामने येणार आहेत. सामन्याला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना किवी संघ इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत तर टीम इंडियाने आपला आयसोलेश कालावधी पूर्ण करून पहिल्या प्रशिक्षण सत्रात भाग घेतला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारतीय संघ आणि किवी संघातील अनेक खेळाडूंसाठी संस्मरणीय ठरेल. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) तसेच किवी संघाच्या रॉस टेलर (Ross Taylor), बीजे वॅटलिंग (BJ Watling) सोबत अनेक खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची मोठी संधी आहे. (ICC WTC Final 2021: टीम इंडियाने कसली कंबर, न्यूझीलंड विरोधात फायनल लढतीसाठी सुरु केली तयारी Watch Video)

1. कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटी सामना खेळणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा माजी वेगवान बॉलर झहीर खानच्या मोठ्या विक्रमाच्या मागावर आहे. झहीरने 311 कसोटी विकेट्स घेतल्या असून इशांत त्याच्या 9 विकेट्स मागे आहे.

2. न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरला कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 188 धावांची आवश्यकता आहे. त्याने भारताविरुद्ध 14 कसोटी सामन्यात 812 धावा काढल्या आहेत. याशिवाय, सचिन तेंडुलकरच्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यातील 4 शतकांची बरोबरी करण्यापासून तो एक शतक दूर आहे.

3. न्यूझीलंड संघ वॅटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्टाईलने विदाई देण्यासाठी उत्सुक असतील. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात सर्वाधिक डिसमिसल्सच्या एमएस धोनीचा रेकॉर्ड मोडण्यापासून त्याला फक्त एक विकेटची गरज आहे.

4. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला 2000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 46 धावांची आवश्यकता आहे. याशिवाय त्याने सर्वात प्रदीर्घ स्वरूपात 220 विकेट्सही घेतल्या आहेत.

5. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमच्या 414 विकेट्सच्या पुढे जाण्यासाठी अश्विनला फक्त सहा विकेट्स हव्या आहेत. कसोटी सामन्यात भारताकडून तिसऱ्या सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हरभजन सिंहचाही रेकॉर्ड मोडू शकतो. भज्जीने 417 कसोटी विकेट्स काढल्या आहेत. शिवाय, अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी फक्त 4 बळींची गरज आहे. त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 67 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वाधिक 70 विकेट्स घेतलेल्या आहेत.

6. भारतीय कर्णधार चॅम्पियनशिप सामन्यात संघाचे नेतृत्वात करण्यासाठी मैदानावर उतरताच माजी कर्णधार एमएस धोनीच्या पुढे जात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा भारतीय क्रिकेटर ठरेल.

7. विराट ब्रिगेडला न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. 2003 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडला अखेर भारताने पराभूत केले होते.

8. टीम इंडियाचा तडाखेबाज सलामी फलंदाज रोहित शर्माकडे देखील WTC मध्ये मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. रोहितने आजवर या स्पर्धेत 4 शतके केली आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने 5 शतके केलेली आहेत. अशापरीस्थितीत रोहितला सामन्याच्या दोन डावात लाबूशेनची बरोबरी करण्याची सुवर्ण संधी आहे.

9. विराट कोहलीने 2019 मध्ये अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक केले होते. अशास्थितीत आपल्या शतकांचा दुष्काळ संपवण्यासाठी चॅम्पियनशिपचा ब्लॉकबस्टर फायनल सामना विराटसाठी एक मोठे व्यासपीठ असेल. विराटने अशी कमाल केल्यास तो माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या 71 आतंरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल आणि कर्णधार म्हणून पॉन्टिंगच्या 41 शतकांना मागे टाकेल.

10. भारतीय कर्णधार कोहलीला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकहजारी धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी 123 धावा दूर आहे. विराटने चॅम्पियनशिपच्या 14 सामन्यात 877 धावा काढल्या आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change