विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: Instagram)

ICC WTC Successful Captains List: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) प्रवास आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. साउथॅम्प्टनच्या  (Southampton) एजस बाउल स्टेडियमवर 18 जून रोजी भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल ज्यानंतर क्रिकेटविश्वाला पहिला जागतिक कसोटी चॅम्पियन संघ मिळेल. आयसीसीने नव्याने डिझाइन केलेल्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडपुढे अव्वल स्थानावर आहे. परंतु इंग्लंडने चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सामने जिंकले. जर आपण या कसोटी चॅम्पियनशिपमधील सर्वात यशस्वी कर्णधारांबद्दल चर्चा केली तर असे काही कर्णधार आहेत ज्यांची विजय टक्केवारी 50% पेक्षा जास्त आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 5 यशस्वी कर्णधारांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ड्रॉ किंवा बरोबरीत सुटल्यास कसा ठरणार विजेता संघ?)

बाबर आजम (Babar Azam)

हे नाव वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल. पाकिस्तानचा नवीन कर्णधार बाबर आजम आयसीसी WTC मध्ये कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस अझर अलीच्या जागी बाबरला पाकिस्तानचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते, ज्याच्या अंतर्गत त्यांनी 8 पैकी 2 सामने जिंकले. बाबरची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी 100 % असली तरी लक्षात घेण्यासारखे म्हणजे 2021 दरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दोन सामन्यात संघाचे चॅम्पियनशिपमध्ये नेतृत्व केले आणि विजयी ठरला. आयसीसी WTC च्या 10 सामन्यात 932 धावा करून आझम हा पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

विराट कोहली (Virat Kohli)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या कसोटी चँपियनशिपच्या 14 सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी कोहली 10 सामने जिंकण्यात यशस्वी झाला असून 4 सामन्यात त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विराटची टक्केवारी 71% असून त्याच्या नेतृत्वात संघाला न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीप तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अ‍ॅडिलेड कसोटी व इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभव पराभव पत्करावा लागला होता.

केन विल्यमसन (Kane Williamson)

अंतिम सामन्यातील अन्य कर्णधार केन विल्यमसनने ब्लॅक कॅप्सचे 9 सामन्यांत नेतृत्व करत 6 मध्ये विजय मिळवला आहे. विल्यमसन जखमी झाल्यावर टॉम लाथमने उर्वरित दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून कामगिरी केली आणि किवींना विजय मिळवून दिला. विल्यमसनची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी 67% आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचं श्रेय अजिंक्य रहाणे इतकं इतर कोणालाही मिळत नाही. पहिल्या कसोटीनंतर कोहली अनुपलब्ध झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनपैकी शेवटचे दोन सामने जिंकून त्याच्या नेतृत्वात संघाने जबरदस्त कमबॅक केलं. रहाणेने मेलबर्नमध्ये जबरदस्त शतक झळकावत आघाडीने नेतृत्व केले. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 43.80 च्या सरासरीने 1095 धावा करणारा भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.

टिम पेन (Tim Paine)

ऑस्ट्रेलियाचा टिम पेन सध्या कसोटी संघाचा कर्णधार असून त्याने 14 सामन्यांचे संघाची धुरा सांभाळली आहे. त्याने 8 सामन्यात कांगारू संघाला विजय मिळवून दिला तर 4 सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द/स्थगित झाला नास्ता तर कांगारू संघ कदाचित टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात पोहोचला असता.