ICC WTC 2021-23: मोहाली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) एक हाती विजय नोंदवल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये (World Test Championship) भारताची (India) टक्केवारी सुधारून 54.16 झाली आहे. तथापि, ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे टॉप-4 मध्ये असून टीम इंडिया (Team India) पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान 12 ते 16 मार्च दरम्यान बेंगलोर येथे होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत सामन्यात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील, जो दिवस-रात्र खेळला जाणार आहे. भारताच्या WTC सायकलमध्ये सात कसोटी सामने शिल्लक आहेत ज्यात इंग्लंड (अवे) विरुद्ध एक, बांगलादेश (अवे) विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि ऑस्ट्रेलिया (घरच्या) विरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यादरम्यान भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्रतेसाठी सर्व संघांची शक्यता स्पष्ट करताना भारतासाठी हे कठीण होणार असल्याचे ठामपणे सांगितले. (ICC WTC 2021-23 Points Table: मोहाली कसोटीत विजय मिळवूनही टीम इंडियाची स्थिती जशास तशी, तर श्रीलंकेची मोठी घसरण; पहा गुणतालिकेत संघांची स्थिती)
“ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत भारताला 100 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही ड्रॉ करू शकत नाही, तुम्हाला चारही गेम जिंकावे लागतील,” आकाशने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर सांगितले. “आम्ही श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने जिंकण्याची शक्यता आहे. आम्हाला बांगलादेश दौऱ्यावर खेळायचे आहे, मला विश्वास आहे की आम्ही तिथे जिंकू. आणि इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी आम्ही दक्षिण आफ्रिकेत मालिका गमावली, त्यामुळे ते सोपे होणार नाही.” याशिवाय गतविजेता न्यूझीलंड अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार नाही असा विश्वास माजी भारतीय दिग्गजने व्यक्त केला, तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे या स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार असतील असे म्हटले. शिवाय आकाशने अंतिम स्थानाच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेला “डार्क हॉर्स” म्हणून संबोधले. “दक्षिण आफ्रिका हा डार्क हॉर्स आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला, इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत केल्यास त्यांना चांगली संधी आहे. ते घरच्या मैदानावर जिंकतील, या बाहेरच्या मालिकेवर त्यांना लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे त्यांना बाहेरून चांगली संधी आहे. पण आघाडीवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आहेत. मला वाटते की त्यांच्यामध्ये फायनल होईल.”
“न्यूझीलंडचे घरच्या मैदानावर फक्त 2 कसोटी बाकी आहेत. त्यांनी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका अनिर्णित ठेवली आहे. न्यूझीलंड पात्र ठरणार नाही. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात उरलेल्या दोन कसोटी जिंकल्या तरी, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामने आणखी खेळायचे आहेत. त्यांच्यासाठी खेळ खल्लास झाला आहे, ते पात्र ठरणार नाहीत,” आकाश म्हणाले. “मी इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडिजची गणना करत नाही आणि मी न्यूझीलंडचीही गणना करणार नाही. मला वाटत नाही की श्रीलंकेला पात्रतेची संधी आहे. मला विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया, भारत आणि पाकिस्तान या तीन संघांमध्ये शर्यत असेल. जर पाकिस्तानने अशी स्थिती तयार केली नाही तर पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया फायनल होण्याची दाट शक्यता आहे.”