ट्विटरवर आपल्या विनोदी ट्वीट्स आणि मिम्समुळे बरेच लोकप्रिय असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू वासिम जाफर (Wasim Jaffer) यांनी आता आपल्या अधिकृत वाहिनीवरून यूट्यूबवर पदार्पण केले आहे. आणि आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये जाफर यांनी साउथॅम्प्टन (Southampton) येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी भारतीय फलंदाजांना एक गूढ संदेश पाठवला आहे. 18 जूनपासून (शुक्रवार) साऊथॅम्प्टनच्या रोज बाउल (Rose Bowl) येथे होणाऱ्या बहुचर्चित अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जबरदस्त सामना अपेक्षित असल्याने जाफरने भारतीय फलंदाजांने जुन्या बॉलिवूड चित्रपटांतील पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी व ते ज्यासाठी प्रसिद्ध आहेत ते करावे असा सल्ला दिला आहे. (ICC World Test Championship: ‘सबका बदला लेगा तेरा व्हाईट वॉकर’, Ashwin याच्या ट्विटला Wasim Jaffer ची मजेदार रिअक्शन, पहा Tweet)
“मी भारतीय संघाबरोबर दोनदा इंग्लंड दौर्यावर गेलो आहे. भारतीय फलंदाजांसाठी माझा कोडित संदेश असा आहे की - जुन्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आमची पोलिस जे करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते करा. अंतिम सामन्यात फलंदाजी करताना याचा वापर करा,” जाफरने आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले आहे. कमेंट्स विभागातील अनेक चाहत्यांनी जाफरचा मजेदार लपलेल्या संदेशाला डीकोड केला आहे आणि जुन्या चित्रपटांमध्ये नेहमी उशिरा येणार्या पोलिसांचा उल्लेख आहे. अशा प्रकारे, आपल्या कोडित संदेशासह, जाफरला असे सांगायचे आहे की जर परिस्थितीत सीम आणि हालचाल करण्यास मदत मिळाली तर भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध उशीरा खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Debuting on @YouTube with a coded msg to Indian batsmen. See if you can decode😉 https://t.co/d7lZxwrbyO#WTCFinals https://t.co/YqGZyul93g
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 14, 2021
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा एकमेव मालिका पराभव न्यूझीलंडविरुद्ध झाला होता आणि ‘विराटसेना’ किवी गोलंदाजांच्या गुणवत्तेपासून सावध असतील. शिवाय, नुकत्याच पार पडलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडला आठ विकेट्सनी हरवून न्यूझीलंड फायनल सामन्यात आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. किवी संघाने इंग्लंडमध्ये दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी लय मिळवण्यासाठी टीम इंडियाने साऊथॅम्प्टनमध्ये इंट्रा-स्क्वॉड सामना खेळत आहे आणि रिषभ पंत, शुभमन गिल आणि इशांत शर्मा यासारख्या काही खेळाडूंनी सराव सामन्यात प्रभावित केले आहेत.